Gulabrao Patil | ’इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा’, गुलाबराव पाटलांनी राज्य सरकारच्या सक्तीचे केले समर्थन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Gulabrao Patil | शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) आज 2 ऑक्टोबरपासून सरकारी कर्मचार्‍यांना फोनवर किंवा एकत्र येऊन बोलताना हॅलो ऐवजी, वंदे मातरमने (Vande Mataram) संवादाची सुरूवात करण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) जीआर काढला आहे. ही घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली होती. आता तर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा… असे म्हणत सक्तीचे समर्थन केले आहे.

 

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते आज भुसावळ तालुक्यातील कोठारा, कोठारा बुद्रुक, फुलगाव, व कंडारी येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, ज्या मातीमध्ये तुम्ही राहता त्या मातीला नमन करणे म्हणजे वंदे मातरम होय. इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा, असे पाटील यांनी म्हटले आहे.

 

पाटील पुढे म्हणाले, वंदे मातरम म्हणणं काही चुकीचं नाही, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) स्वतः निवडून आले नाहीत, त्यांना एमआयएमने पाडलं, तू सुधार म्हणावं बाबा.

दरम्यान, राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी वंदे मातरमच्या सक्तीबाबत म्हटले
की, कर्मचार्‍यांनी फोन कॉलला उत्तर देताना हॅलो ऐवजी ’वंदे मातरम’ म्हणावे असे आदेश महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केले आहेत.
’वंदे मातरम’ भारतीयांमध्ये अभिमानाची व देशभक्तीची भावना जागृत करते.
मात्र सक्तीने असे म्हणण्यास भाग पाडणे योग्य नाही. कर्मचारी त्यांचे खासगी फोन वापरत असतानाही वंदे मातरम म्हणण्यास सांगितले जात आहे.
हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचे उल्लंघन आहे. लोकांवर विशिष्ट प्रकारची मानसिकता लादण्याचा हा प्रयत्न आहे.
कर्मचार्‍यांना अभिमानाने ’वंदे मातरम’ म्हणू द्या जबरदस्ती नको, असे क्रास्टो म्हणाले.

 

Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil clearly said is desh me rahna hoga to vande mataram kehna hoga

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Electric Scooter Battery Blast In Mumbai | धक्कादायक! इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीच्या स्फोटात 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Pune Chandni Chowk Traffic Start | चांदणी चौकातील वाहतूक साडे अकरा तासांनी पूर्ववत

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क