
Gulabrao Patil | सुषमा अंधारेंवर टीका करताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, म्हणाले – ‘ठाकरेंच्या पिक्चरमध्ये अंधारे या…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याविषयी चुकीचा उल्लेख केला आहे. सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर या दोघांमध्ये कलगीतुरा सुरु झाला. दरम्यान टीका करताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची जीभ (Controversial Statement) घसरली.
ठाकरे यांच्या पिक्चरमध्ये नटीची (Actress) गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. सुषमा अंधारे या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Election (BMC) लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे त्यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईलं आणलं, अशी टीका गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सुषमा अंधारे यांच्यावर केली.
आम्ही गद्दार नव्हतोच…
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज कबुली दिली आहे की शिवसेनेत फूट पडण्यामागे मी स्वत: जबाबदार आहे,
यावर पाटील म्हणाले, मूळ चुका या त्यांच्याच होत्या. मात्र तरीही आम्हाला गद्दार म्हटले जाते. आम्ही गद्दार नव्हतोच.
आम्हाला त्यांनी समजूनच घेतले नाही. राज्यात आज फिरताहेत, आपण मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहात,
आणि बाळासाहेबांचे नातू आहात. त्यामुळे फिरल्यामुळे, काही ना काही नाराजी या दूर होतील.
गाढवांच्या पुढे वाचली गाथा रात्रीचा…
समस्या दूर होतील असे वाटले होते. पण गाढवांच्या पुढे वाचली गाथा आता रात्रीचा गोंधळ बराच होता असे म्हणत एखाद्या माणसाने सांगावे आणि इतरांनी ते ऐकूच नये.
याबद्दल मी आदित्य ठाकरेंना गाढव म्हणणार नाही. त्यांनी आमच्या समोर वाचलं पण आम्ही गाढव होतो का काय.
त्यांनी आता कबुली दिली मात्र वेळ निघून गेली आहे, असा टोला पाटील यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil controversial statement of sushma andhare
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | बारामतीत पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या 5 जणांना अटक, जाणून घ्या ‘फायरिंग’चे कारण
Roger Binny | ICC ने भारताला दिले झुकते माप, रॉजर बिन्नी म्हणाले….