Gulabrao Patil | शिवसेना वाचवण्यासाठीच आम्ही मंत्रीपदे सोडली – गुलाबराव पाटील

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Gulabrao Patil | शिवसेनेतील बहुतांश बंडखोर आमदार (Shivsena Rebel MLA) आता आपआपल्या मतदारसंघात परतले आहेत. समर्थकांकडून त्यांचे स्वागतही ठिकठिकाणी करण्यात आले. मात्र सर्वत्र पक्षात फूट पडल्याचे आणि नाराजी असल्याचे दिसत आहे. आता बंडखोर आमदार आपल्या मतदार संघात सुद्धा आपली बाजू मांडत बंडखोरी का केली याचे स्पष्टीकरण देत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही बंडखोरी का केली याचे स्पष्टीकरण दिले आहे.

 

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आमदारांच्या नाराजीची वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी कधी समजून घेतले नाही. शेवटी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला. आपल्या भावना व्यक्त करताना गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, लोक ग्रामपंचायत सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत. आम्ही मंत्रिपदे सोडून उठाव केला. एक नाही तर 8 मंत्रिपदे सोडली. शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे.

 

विधीमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात (Legislative Special Session) सभागृहात बोलताना सुद्धा गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, शरद पवार (Sharad Pawar) यांचे इतके वय झाले आहे तरी सुद्धा ते सातत्याने राज्यात फिरत असतात. जयंत पाटील (Jayant Patil) माझ्या मतदारसंघात येऊन गेले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आले. आम्हाला वाटत होते नेते मतदाससंघात यावेत मात्र तसे कधीही घडले नाही.

आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टिका करताना त्यांनी चहापेक्षा किटली गरम असे म्हटले होते.
ते म्हणाले होते की, पक्षात संवादाचा अभाव होता. कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात नव्हता. मतदारसंघात कधी नेतृत्व फिरकले नाही.
तसेच हिंदुत्वासाठी (Hindutva) भाजप, शिवसेना एकत्र येणे गरजेचे होते म्हणून आम्ही बाहेर पडलो.

 

Advt.

Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil once again criticizes shiv sena and uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Water Supply | पुणेकरांना दिलासा ! बकरी ईद व आषाढी एकादशीमुळे पुण्यातील पाणी कपातीच्या वेळापत्रकात बदल

 

Mukhtar Abbas Naqvi | मुख्तार अब्बास नक्वींचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा, उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळणार ?

 

Pune Crime | पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 81 लाखाचा मुद्देमाल जप्त