Gulabrao Patil | ‘सुषमा अंधारे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट’, गुलाबराव पाटलांची जळजळीत टीका

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Group) वतीने सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या महाप्रबोधन यात्रेचे (Mahaprabodhan Yatra) आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा जळगाव जिल्ह्यात पोहोचली असून सुषमा अंधारे यांची पहिली सभा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या धरणगाव येथे पार पडली. यावेळी अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून (NCP) आलेले पार्सल आहे आणि उरली सुरली शिवसेनादेखील त्या संपवून टाकतील, अशा शब्दात पाटील यांनी अंधारे यांच्यावर जळजळीत टीका केली. तसेच ठाकरे गटाने सावध व्हावं असा सल्ला देखील त्यांनी दिला.

 

शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असून शिवसेनेच्या स्थितीसाठी तेच जबाबदार असल्याची टीका सतत केली जाते. आता उरली सुरली शिवसेना संपवण्यासाठी सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीने पाठवल्याची टीका गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे.

 

महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्या भाषणांवर जळगावात बंदी घालण्यात आली आहे.
यावरुन गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे व ठाकरे गटातील नेत्यांमध्ये वाक् युद्ध सुरु झाले आहे.
गुलाबराव पाटलांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. पायाखालची वाळू सरकली आहे,
म्हणून खोटे गुन्हे (FIR) दाखल करत आहेत. मात्र आम्ही अशा गुन्ह्यांना भीक घालणार नाही, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले.

तर गुलाबराव पाटील यांनी महाप्रबोधन यात्रेवरुन टीका करताना म्हणाले, ही महाप्रबोधन यात्रा नाही तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा आहे.
हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. उरली सुरली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांना पाठवल्याची टीका पाटील यांनी केली.

 

Web Title :- Gulabrao Patil | jalgaon gulabrao patil warning to uddhav thackeray that sushma andhare is parcal from ncp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arvind Sawant | अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित, ‘गुजरातला प्रकल्प पळवले आणि निवडणूक जाहीर झाली आता महाराष्ट्रासाठी…’

Siddharth Malhotra-Kiara Advani | सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी करणार धुमधडाक्यात लग्न

Shahajibapu Patil | ‘त्या’ विधानावरुन शहाजीबापूंचा अजित पवारांना खोचक सवाल, म्हणाले- ’95 साली कुठल्या गावाला गेला होता?’