Gulabrao Patil | आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, मात्र…, गुलाबराव पाटलांचा टोला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही शिवसेनेत (Shivsena) 35 वर्षापासून काम करत आहोत आणि 32 वर्षाचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आमच्यावर गद्दार असल्याचा शिक्का मारतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका करतात, हे योग्य आहे का? आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात. मात्र, शिवसेनेच्या विचारांचे वारसदार नाही, अशा शब्दात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केलं. एका वृत्तवाहीनीशी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते.

 

ही स्थिती संजय राऊतांमुळे
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, आम्ही केलेला उठाव हा केवळ शिवसेनेच्या भल्यासाठी आहे. आमची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी नाही. मात्र, ज्यांनी उद्धव ठाकरे यांना घरले आहे त्यांच्यासोबत आमची नाराजी आहे. शिवसेनेची सद्य:स्थिती ही केवळ खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यामुळेच निर्माण झाल्याचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले.

 

राऊतांचे ‘ते’ वाक्य आजही कानात घुमते
राष्ट्रवादीच्या आमदारांची (NCP MLA) कामे होत असताना शिवसेनेच्या आमदारांना मंत्रालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या.
आमचे मुख्यमंत्री असताना त्यांना वेळ मिळत नसल्याने आमच्या समस्या कोणाकडे मांडायच्या, अशी परिस्थिती होती.
पक्षाचे एक नाही तर 8 मंत्री 40 आमदारांनी बंड केले तरीही गांभीर्य नाही, की त्यांना थांबवावे,
आम्ही समजवायला गेलो तर संजय राऊत म्हणाले होते की, ‘दिसतात तर सिंहासारखे मात्र हृदय उंदरासारखे’
हे राऊतांचे वाक्य असूनही कानात घुमतेय असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती
शिवसेना फुटू नये यासाठी आम्हीही प्रयत्न केले. तसेच सोडून जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे बसून सर्वांना बोलावून घेण्याची विनंती केली.
एवढेच नाही तर बंड होण्याच्या चार महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, आमदार नाराज असल्याची कल्पना दिली.
मात्र, त्यांची प्रतिक्रिया केवळ बघू, करु, अशी होती.
आता या उठावानंतर जेथे आहोत त्या ठिकाणी ठिक असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिंदे गटाच्या समेटाबाबत त्यांनी स्पष्ट नकार दिला.

 

Web Title :- Gulabrao Patil | loyalists who worked for 35 years had to listen to 32 year old aditya thackeray says gulabrao patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Steel | ट्विन टॉवर पाडणार्‍या कंपनीचे लक्ष आता टाटा स्टीलवर, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण…

 

Ramdas Kadam | ‘मातोश्रीवर किती खोके गेले माहिती, तोंड उघडायला लावू नका’, रामदास कदमांचा इशारा

 

Pune Crime | FTII मध्ये शिकणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची आत्महत्या, महिन्याभरातील दुसरी घटना