Gulabrao Patil On Uddhav Thackeray | गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘शिवतीर्थावर सभा झाली पाहिजे पण सोनिया गांधी आणि शरद पवार….’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Gulabrao Patil On Uddhav Thackeray | शिवतीर्थावर (Shivtirtha) त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. सभा झालीच पाहिजे. पण त्या सभेत सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) विचार मांडू नका, असा टोला शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री गुलाबराव पाटलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Gulabrao Patil On Uddhav Thackeray) यांना लगावला आहे.

 

गुलाबराव पाटील म्हणाले, शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dasara Melava 2022) घेण्यासाठी ठाकरे गटाला (Thackeray Group) न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे. यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असे होत नाही. तीन तासाची सभा त्यात कोणती लढाई. आम्ही देखील बीकेसी मैदानावर (BKC Ground) दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कोणाकडे जास्त लोक येतात याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Gulabrao Patil On Uddhav Thackeray)

 

पुण्यात पीएफआय (PFI) कार्यकर्त्यांनी दिलेल्या कथित घोषणांबाबत गुलाबराव पाटील म्हणाले, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजी करणार्‍या लोकांवर सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांना जेलमध्ये टाकून ते बाहेर येणार नाहीत, असे ठेचले पाहिजेत.

पाटील पुढे म्हणाले, या देशाचे अन्न खायचे. हवा घ्यायची आणि पाकिस्तानचे नारे द्यायचे मग त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून दिले पाहिजे.
मला तर असे वाटते कोणीही असो, कोणत्याही जातीधर्माचा असो पहिला देश महत्वाचा आहे.
असे असताना जर देशाच्या बाबतीत अशी घोषणाबाजी होत असेल तर सरकारची आणि आपली जबाबदारी आहे
की अशा वृत्तीला ठेचून टाकले पाहिजे.
अशा प्रकारची घोषणाबाजी होत असल्याचे मी पण चॅनलवर पाहिले,
हाच मोठा पुरावा आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

 

Web Title :- Gulabrao Patil On Uddhav Thackeray | dont share the views of sonia gandhi and sharad pawar gulabrao patils target to uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | शिंदे गटात सामील झालेल्या दीपक केसरकरांना लागली लॉटरी, मुंबईच्या पालकमंत्री पदाची मिळाली जबाबदारी

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा