Gulabrao Patil | हल्ल्यानंतर एकनाथ खडसेंचा शिवसेनेवर आरोप; गुलाबराव पाटलांनी केला पलटवार, म्हणाले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Gulabrao Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे यांनी खुलासा करत हा हल्ला शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचे त्या म्हणाल्या. यानंतर शिवसेना व खडसे कुटुंबीयांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. या हल्ल्यानंतर खडसे कुटुंबीयांनी थेट यांच्यावर आरोप केलेत. या आरोपानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पलटवार केला आहे.

 

गुलाबराव पाटील म्हणाले, ‘रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्हच आहे. मात्र, जोपर्यंत पोलिसांकडून चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आरोप करणे चुकीचे आहे. या हल्ल्याची आयपीएस अधिकार्‍याकडून नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी खुद्द स्थानिक आमदारांनी केलीय. त्यानुसार चौकशी होऊन ‘दूध का दूध, पानी का पानी’ समोर येईलच. यात जो कोणी दोषी असेल, मग तो आमच्या पक्षाचा असला तरी हयगय केली जाणार नाही. मात्र पोलिसांकडून चौकशी होऊन नेमक तथ्य समोर येईपर्यंत खडसे कुटुंबीयांनी शिवसेनेला बदनाम करू नये.

 

हल्ल्यावरुन खुद्द एकनाथ खडसे यांनी शिवसेना आमदार यांच्यावर निशाणा साधला होता. हा कसला शिवसेनेचा आमदार? असं देखील म्हणाले होते. दरम्यान यावरुनही गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील हे कोणत्या पक्षाचे आमदार आहेत त्याचे सर्टिफिकेट एकनाथ खडसेंनी देऊ नये. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. कोण कोणत्या पक्षात होते आणि पक्ष सोडून आता कोणत्या पक्षात आहे हे सार्‍या जगाला माहिती आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा हे बघण्यापेक्षा तो महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आमदार आहे हे महत्त्वाचं आहे.

‘खडसे स्वत: आघाडीचे नेते आहेत. गोष्टी इतक्या पुढं जाऊ नयेत याची काळजी त्यांनी आधीपासूनच घ्यायला हवी होती.
आमचेही विरोधक जळगाव जिल्ह्यात आहेत. आम्हीही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतो,
पण इतक्या खालच्या पातळीवर कोणी जात नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून गोष्टी समजुतीने घेतल्या पाहिजेत,’
असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Gulabrao Patil | shivsena leader and water supply minister gulabrao patil slams ncp leader eknath khadse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in India | ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’, महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट

 

GST Returns | व्यापार्‍यांसाठी दिलासादायक ! GST रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या 2022 मध्ये कोणत्या महिन्यापर्यंत फाईल करू शकता रिटर्न

 

Rashifal 2022 | वार्षिक राशिफळ 2022 ! मेषपासून मीन राशीपर्यंत ‘नशीबाचे कनेक्शन’, जाणून घ्या कसे असेल तुमचे ‘नवीन वर्ष’