Gulabrao Patil | ‘… मग आम्ही पण अजित पवारांना गद्दार म्हणायचं का?’, गुलाबराव पाटलांचा खोचक सवाल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या (Shivsena) 40 आमदारांनी बंडखोरी (Rebel MLA) केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांमध्ये आरोपप्रत्यारोप होताना पहायला मिळत आहे. दरम्यान एकेकाळी शिवसेनेचे कट्टर असलेले गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर शुक्रवारी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली होती. यावर आता गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पलटवार केला आहे. जळगावमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात पाटील बोलत होते.

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले कि, अजित पवार हे विरोधी पक्षनेते (Opposition Leader) आहेत. टीका करणं त्यांचे काम आहे. पण अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. परंतु त्यांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे, असे पाटील म्हणाल. मात्र अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, सरकारच्या चांगल्या व वाईट अशा गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

तीन पक्ष एकत्र लढतील वाटत नाही

महाविकास आघाडीचे प्रॉपर उमेदवारच ठरत नाहीये, प्रॉपर मतदारसंघ (Constituency) ठरलेला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजून त्यांची युती पक्की झालेली नाही तर आमदारकीच्या निवडणुकीत कोण? आगामी विधानसभेत (Legislative Assembly) तीन पक्ष महाविकास आघाडी लढवतील असे आपल्याला वाटत नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

माझ्या मागे दोन गुलाबराव

माझ्या विरोधात दोन गुलाबराव फिरत असून दोन्ही आतापासून आमदार झालेले आहेत. परंतु ही जागा कुणाला मिळेल? पुढे काय समीकरण राहील? याचा विचार कुणी केला आहे. त्यामुळे दोन्ही गुलाबरावांनी आधी नवरदेव कोण? हे ठरवले पाहिजे! असा खोचक सल्ला आज गुलाबराव पाटील यांनी दिला.

Web Title :- Gulabrao Patil | ‘… Then should we also call Ajit Pawar a traitor?’, asked Gulabrao patil