Gulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता, काँग्रेसचा ‘हात’ सोडून नवा पक्ष स्थापन करणार?

श्रीनगर : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधील (Congress) नाराजी आणि धूसपूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Former CM Capt. Amarinder Singh) यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट नवीन पक्षाची स्थापना केली. यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचे राजीनामा नाट्य रंगले. पंजाबमधील हा वाद शांत होत नाही तोच आता जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) नवीन पक्ष (new party) स्थापन करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

गुलाब नबी आझाद (Gulam Nabi Azad) काँग्रेसमधील असंतुष्ट जी-23 गटातील एक दिग्गज नेते आहे. जम्मू काश्मीरमधील पूँछ येथे एका जनसभेला संबोधित करताना 2024 मध्ये काँग्रेस 300 जागा जिंकताना दिसत नाही, असा दावा केला. तर दुसरीकडे आझाद यांच्या सभांना मोठी गर्दी (crowd rallies) होत असल्याने काँग्रेस पर्यवक्षक आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी दिवसात आझाद काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी नवा पक्ष स्थापन केल्यास पक्षातील अनेक नेते त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.

 

अनेक नेते आझाद यांच्या संपर्कात

गुलाम नबी आझाद यांच्या जनसभांना होणारी गर्दी वाढत असल्याने त्यांचा उत्साह वाढत आहे. यातच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळायला हवा. तसेच विधानसभा निवडणुका (Assembly election) व्हायला पाहिजेत, यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनुच्छेत 370 रद्दबाबत होत असलेल्या टीकेला आझाद यांनी उत्तर दिले आहे. तसेच काहींच्या मते इतर पक्षातील अनेक नेते आझाद यांच्या संपर्कात असून, आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यास ते सर्व नेते आझाद यांच्या नव्या पक्षात सहभागी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

काँग्रेस आझाद यांचा सन्मान करते

काँग्रेसचे प्रवक्ते रविंदर शर्मा (Spokesperson Ravinder Sharma) म्हणाले,
संपूर्ण काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा सन्मान करतो.
मात्र, पक्षाच्या शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.
आझाद यांचे निकटवर्तीय ज्या पद्धतीने विधाने करत आहेत,
त्यावरुन पक्ष शिस्तीचे ते उल्लंघन करत असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान आझाद यांचे निकटवर्ती समजले जाणाऱ्या 20 नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा