Gulshan Grover | बॉलिवूड अभिनेते माझाच लूक कॉपी करतात; अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या वक्तव्याची बॉलिवूडमध्ये चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेते गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) यांची चित्रपटसृष्टीत एक वेगळीच ओळख आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गुलशन यांनी खलनायकाची (Villain) भूमिका साकारली आहे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले कि सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे खलनायकाची भूमिका साकारण्यापूर्वी माझाच लूक कॉपी करतात. याशिवाय गुलशन म्हणाले की, त्याचे जवळचे मित्र जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) , संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनील शेट्टी यांच्यामुळे काही प्रोजेक्ट्स त्याच्याकडून काढून घेण्यात आले.

गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover)  यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की न्यू एज व्हिलन पैकी तुमचा आवडता खलनायक कोण आहे, तेव्हा ते म्हणाले कि, प्रत्येकजण माझे चित्रपट बघतात आणि स्टुडिओत तसं काम करतात. त्यामुळे कोण आवडते असू शकते.” तसेच ते म्हणाले कि ‘जॅकी, सुनील आणि संजय यांनी माझ्यासारख्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली.’

गुलशन ग्रोवर यांची कारकीर्द

(Gulshan Grover) गुलशन ग्रोवर यांनी राम लखन (Ram Lakhan), अवतार (Avatar), हेरा फेरी (Hera Pheri)
आणि गँगस्टर (Gangster) या हिट चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली.  खिलाडी, सौदागर, कुर्बान,
अनाडी, राजा बाबू, मोहरा, राजा की आएगी बारात, कौन कितना पानी में, सडक 2 आणि सूर्यवंशी या चित्रपटांमध्ये
महत्वाची भूमिका पार पाडली आहे. लवकरच गुलशन ग्रोवर यांचा ‘इंडियन 2’ हा तमिळ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title :- Gulshan Grover | gulshan grover said saif ali khan copies his look

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Balasaheb’s Shivsena | डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेवरुन ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे’ गटात मोठा वाद

MLA Eknath Khadse | बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना टोला