बर्थडे स्पेशल : गुलजार

संपूरान सिंह कालरा (गुलजार)
कवी, गीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक  , निर्माता ,लेखक ,पटकथालेखक
जन्म: १८ ऑगस्ट, १९३४ झेलम (पाकिस्तान)

कवी, गीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले गुलजार यांचा जन्म ब्रिटिश भारतातील झेलम जिल्ह्यात (सध्या पाकिस्तान) झाला. भारत-पाक विभाजनानंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थयिक झाले. कल्पनांच्‍या पलीकडे जाऊन शब्दांची रचना करणार्‍या गुलजार यांनी कमी  वयात लेखनाची सुरूवात केली होती.  त्यांच्या अनेक रचनांनी कविता, साहित्‍यातच नाही तर हिंदी सिनेसृष्‍टीत स्‍थान मिळवले. ‘तुझसे नाराज नही…’पासून ते ‘बिडी जलायले…’पर्यंतच्या त्यांची गाणी खूपच लोकप्रिय ठरली.

त्यांनी १९६३ च्या फिल्म ‘ बंदीनी’ मध्ये संगीतकार एस. डी. बर्मन यांच्यासोबत  गीतकार  म्हणून कारकिर्द सुरु केली .त्यांनी  आरडी बर्मन , सलील चौधरी , विशाल भारद्वाज आणि ए.आर. रहमान यांच्यासह अनेक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. १९७० च्या सुमारास त्यांनी आन्धी आणि महोत्सव सारख्या चित्रपटांना  दिग्दर्शित केले . तसेच त्यांनी आनंद (१९७१)  मौसम (१९७५) आणमाचिस(१९९६), ओमकारा (२००६) आणि कामिनी (२००९); दिल से .. (१९९८), गुरू (२००७), स्लमडॉग मिलियनेयर (२००८) आणि रावण (२०१०) आणि बंटी और बबली (२००५)    स्लमडॉग मिलियनेअर (२००७) यांसारख्या असंख्य चित्रपटांसाठी गीतलेखन केलं.
[amazon_link asins=’B07DDFLBBF,B06ZZB71TB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bbd9fb80-a2dc-11e8-95fc-c9c04957d707′]

गुलजार यांनी अनेक कविता, संवाद आणि स्क्रिप्ट देखील लिहिल्या. २००४ मध्ये त्यांना पद्मभूषण , साहित्य अकादमी पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार  पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसहित  २० फिल्मफेअर  पुरस्कार , एक अकादमी पुरस्कार आणि एक ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे

.