Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंचा मुक्काम वाढला ! आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gunaratna Sadavarte | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थावर हल्ला झाल्यानंतर अटक करण्यात आलेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना मोठा झटका बसला आहे. गिरगाव न्यायालयामध्ये (Girgaon Court) पार पडलेल्या सुनावणीनंतर त्यांची पोलीस कोठडी (Police Custody) वाढवण्यात आली आहे.

 

पोलिसांनी 11 दिवसांची कोठडी मागितली होती मात्र दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने दोन दिवसांनी कोठडी वाढवली आहे. सुनावणीवेळी सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत (Adv Pradeep Gharat) यांनी धक्कादायक दावे केले. यामध्ये, शरद पवारांच्या घरावर हल्ला होण्याआधी एक बैठक झाली होती. त्या बैठकीतच या हल्ल्याचं नियोजन ठरलं होतं. (Gunaratna Sadavarte)

 

हल्ला झाला त्या दिवशी सदावर्तेंनी नागपूरमध्ये फोन केला होता. त्यानंतर त्यांनी ते सिम कार्ड (Sim Card) नष्ट केलं. नागपूरमध्ये (Nagpur) त्यांनी कोणाला कॉल केला ?, सहा महिने चाललेल्या संपाला पैसे कोणी पुरवले ?, याचा तपास करायचा असल्याचं वकिलांनी सांगितलं. यावर सदावर्तेंच्या वकिलांनीही युक्तीवादामध्ये प्रत्युत्तर देत काही प्रतिसवाल केले.

 

दरम्यान, सदावर्तेंनी पैसे घेतले असा आरोप केला जातो मात्र अशी तक्रार कोणत्याही कर्मचाऱ्याने केली नाही.
धक्काबुक्कीमध्ये कर्मचारीही जखमी झाला त्यांना कोणीही मारहाण करण्यासाठी गेले नव्हतं.
पोलिसांना जर या आंदोलनाबाबत माहिती होती तर त्यांनी बंदोबस्त का नव्हता केला. ज्या सिमबाबत पोलीस बोलत आहेत त्या सिमकार्डची वैधता 31 मार्चपर्यंत असल्याचं सदावर्तेंचे वकील अ‍ॅड. कुलकर्णी (Adv Kulkarni) यांनी सांगितलं. या पार पडलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सदावर्तेंची आणखी 2 दिवस पोलीस कोठडी वाढवली आहे.

 

Web Title :- Gunaratna Sadavarte | advt gunaratna sadavarte continue to be in police custody till 13 april

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा