Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ ! आणखी दोन जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Gunaratna Sadavarte | एसटी कर्मचाऱ्यांचे (MSRTC Workers) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदावर्ते यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल झाले असून त्यातील एक गुन्हा सांगलीमध्ये (Sangli) आणि दुसरा गुन्हा हा सोलापूरमध्ये (Solapur) झाला आहे. सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

 

सांगलीमधील (Sangli) मिरज पोलीस ठाण्यामध्ये (Miraj Police Station) त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
त्यामुळे आता सोलापूर आणि सांगली पोलीस त्यांचा चौकशीसाठी ताबा मागू शकतात.
मराठा समाजाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सांगलीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदावर्ते यांनी यु ट्युबवर (YouTube) एक व्हिडीओ अपलोड केला होता,
त्या व्हिडीओमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक विलास देसाई यांनी केली होती त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदावर्ते यांच्यावर सोलापूरमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी 5 मे 2021 ला आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), पोलीस अधिकारी विश्वास नांगरे – पाटील (IPS Vishwas Nangare Patil) आणि मराठा संघटना यांच्याविरोधात बोलताना जातीय विधान केल्याचा आरोप केला आहे.

सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) संघटनेचे माऊली पवार यांनी गुणरत्न यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती.
माऊली पवार यांच्या फिर्यादीवरून 155 अ आणि 153 ब, पोलीस अप्रितीची भावना चेतावणे अधिनियमन कलम 3 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
20 एप्रिलला सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये (Faujdar Chavadi Police Station) सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

 

दरम्यान, शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजुर झाला आहे.
सदावर्ते यांच्यासह 115 जणांनाही जामीन मंजूर झाला आहे.
मात्र दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे.

 

Web Title :- Gunaratna Sadavarte | gunaratna sadavartes troubles increase again fir filed in sangli Miraj Police Station solapur Faujdar Chavadi Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा