मुंबई : Gunaratna Sadavarte On Maratha Reservation | मतपेटीसाठी सरकार आरक्षणाचा खेळ खेळले आहे. सरकारमधील तसेच विरोधी पक्षातील लोक जरांगेंबरोबर दिसले. सरकारला कायदा करण्याचा जरूर अधिकार आहे. पण तो कायदा ‘इंद्रा सहानी’च्या विरुद्ध आहे तसेच राज्यघटनेच्या मूळ गाभ्याच्या विरोधात आहे. त्यामुळे या कायद्याला आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊ, अशी प्रतिक्रिया अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ते बोलत होते. (Gunaratna Sadavarte On Maratha Reservation)
मागासवर्ग आयोगाच्या मराठा आरक्षण अहवालावर गंभीर आरोप करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, हे मराठा आरक्षण एका मराठा कार्यकर्त्याने लिहिलेल्या अहवालावर दिलेले आहे. ते कायद्याच्या आधारे टिकणारे नाही. राज्यातील आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. मराठा आरक्षणामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. मराठा समाज हा कोणत्याही अनुषंगाने मागास नाही.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मराठा समाजाच्या बाबतीत सामाजिक मागासलेपणा ज्या निकषांन्वये तपासायला गेले पाहिजे,
ते तपासले गेले नाही. सुनील शुक्रे यांची काम करण्याची पद्धत चुकीची होती.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, सरकारने पारित केलेले विधेयक हे निश्चित वेदनादायी आहे. खुल्या गुणवंतांवर अन्याय करणारे
हे विधेयक आहे. जुलूमशाहीच्या बाजूने सर्वच आमदारांनी चर्चा न करता बाके वाजवली, त्यांचा मी निषेध करतो.
खुल्या गुणवंतांसाठी केवळ ३८ टक्के जागा राहतात. त्यांच्यासाठी आजचा काळा दिवस आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, खुल्या प्रवर्गातील गुणवंतांच्या हक्कासाठी जीवाची बाजी लावू, खून झाला तरी चालेल,
प्रसंगी गोळ्या झेलायला तयार आहे पण खुल्या प्रवर्गातील एक टक्काही जागा कमी होऊ देणार नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा