ध्रुपद गुरु गुंदेचा बंधूंवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील प्रसिद्ध ध्रुपद संस्था सध्या वादात सापडली आहे. संस्थेचे प्रसिद्ध गायक गुंदेचा बंधुंवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. गुंदेचा बंधुंवर त्यांच्या शिष्यांनी जबरदस्ती लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. फेसबुक पोस्टद्वारे विदेशी मुलीने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्याची माहिती समोर येत आहे. तर या आरोपावर तातडीने चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले असून चौकशीत कोणताही मुद्दा आल्यास कारवाईचा निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात आलं आहे.

मागील वर्षी गुंदेचा बंधुमधील रमाकांत यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांचा मोठा भाऊ उमाकांत गुंदेचा हे ध्रुपद संस्थानचे प्रमुख आहेत. अखिलेश गुंदेचा हा लहान भाऊ आहे आणि एक पखवाज वादक आहेत. 2012 मध्ये गुंदेचा बंधूंना पद्मश्री आणि 2017 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत्. खरंतर, ध्रुपद हे देशातील सगळ्यात प्राचिन शास्त्रीय संगीत आहे. ध्रुपद संस्थान हे एक शास्त्रीय संगीत गुरुकुल आहे ज्याला युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे.

फेसबुकवर शेअर केली पोस्ट
संगीत ध्रुपत संस्थानचे दोन प्रसिद्ध गुरु रमाकांत गुंदेचा आणि अखिलेश गुंदेचा यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. युरोप नावाच्या फेसबुक ग्रुपवर यासंबंधी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. एवढंच नाही तर या संगीतकारांच्या विद्यार्थांनादेखील ईमेल पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बऱ्याच वर्षापासून या दोन गुरुंकडून माझा लैंगिक छळ झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्सटरडॅमच्या योग शिक्षकाने फेसबुकवर ही पोस्ट लिहिली आहे. तर यावेळी ओळख उघड होऊ नये यासाठी त्यांनी एका मित्राच्या मदतीने संपूर्ण घटना सोशल मीडियात शेअर केली आहे.

त्यामुळे ही घटना फेसबुकवर शेअर केली
आम्ही तक्रार केली तर बदला घेण्याच्या भीतीने, लोकांनी आमच्यावर टीका केली असती या भीतीने आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे गुंदेचा बंधूंकडून आम्हाला धमकावण्यात आलं. होतं. त्यामुळे आम्ही हा प्रकार फेसबूकवर शेअर केला आहे. असे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. दोघांनी बऱ्याच विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केला असल्याचे पोस्टमध्ये लिहले आहे. शिक्षकांनी महिला विद्यार्थ्याना वाईट पद्धतीने स्पर्श केल्याचेही आरोपी पोस्टमध्ये केला आहे. पोस्टमध्ये पीडितेने लिहिले आहे की आतापर्यंत जे घडले त्याबद्दल मी फक्त माझ्या कुटुंबाला सांगितले आहे. मी संस्थेतल्या कोणाशीही याबद्दल बोललो नाही. दरम्यान, या सगळ्यावर संस्थानाकडून समिती नेमण्यात येणार असून यातून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आंतरराष्ट्रीय गुरुकुलला बदनाम करण्यासाठी असा प्रयत्न केला जात असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.