मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गुंजन सक्सेना ‘द कारगिल गर्ल’ या सिनेमाचा पहिला लुक रिलीज करण्यात आला आहे. गुंजन सक्सेनावर बनत असलेल्या बायोपिकचा फर्स्ट लुक करण जोहरने ट्विटरवरून शेअर केला आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरनेही इंस्टाग्रामवरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
असा आहे फर्स्ट लुक
शेअर करण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये जान्हवी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. एका पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठीचाही लुक दिसून आला आहे. दुसऱ्या फोटोत दिसत आहे की, जान्हवीने स्वेटर घातला आहे आणि तिच्या हातात कागदाचे विमानही आहे. तर तिसऱ्या पोस्टरमध्ये जान्हवीने एअरफोर्स पायलटचा युनिफॉर्म घातला आहे. यामध्ये ती आपल्या साथीदारांसोबत दिसत आहे.
करणने पोस्टर शेअर करताना लिहिले आहे की, “तिला सांगण्यात आलं होतं की, मुली पायलट बनत नाहीत. परंतु ती आपल्या ध्येयावर अडून राहिली आणि तिला उडण्याची इच्छा होती.”
https://twitter.com/karanjohar/status/1166931231323213824
दुसऱ्या पोस्टरमध्ये करणने लिहिलं आहे की, “अदम्य धैर्य आणि शौर्याने तिने माणसाच्या जगात आपले स्थान निर्माण केले. ”
https://twitter.com/karanjohar/status/1166934895005798401
शेअर करण्यात आलेल्या तिसऱ्या पोस्टमध्ये गुंजन वडिलांची (पंकज त्रिपाठी) गळाभेट घेताना दिसत आहे. करण लिहितो की, “तिची (गुंजन) ताकद, तिचे वडिल आहेत. त्यांनीच गुंजनला उडण्यासाठी पंख दिले.”
https://twitter.com/karanjohar/status/1166938604301479936
धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज मिळून निर्मिती करत असलेला हा सिनेमा शरण शर्मा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात जान्हवी कपूर आणि पंकज त्रिपाठी यांच्या व्यतिरीक्त अंगद बेदी, विनीत कुमार, मानव विज हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा