करण जोहरनं केली मोठी घोषणा- ‘Netflix वर रिलीज होणार गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर स्टारर गुंजन सक्सेना या सिनेमाबद्दल ज्या बातम्या समोर येत होत्या त्या आता खऱ्या ठरताना दिसत आहेत. कारण आता गुंजन सक्सेना द – कारगिल गर्ल हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. फिल्ममेकर करण जोहरनं याबाबत घोषणा केली आहे.

करण जोहरन यानं ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना करण म्हणतो, “तिच्या प्रेरणादायी प्रवासानं इतिहास रचला. ही तिची कहाणी आहे. गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल. लवकरच येत आहे नेटफ्लिक्सवर.”

व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर यात जान्हवीचा व्हाईस ओव्हर आहे. ज्यात ती थोडक्यात सिनेमाबद्दल आणि गुंजन बद्दल सांगत आहे. याशिवाय सिनेमा नेटफ्लिक्सवर येत आहे असंही ती शेवटी म्हणते.

https://twitter.com/karanjohar/status/1270227046937948160

गुंजन सक्सेना हा सिनेमा ओटीटी वर रिलीज करण्याचा मोठा निर्णय आता इतर फिल्ममेकर्सला विचार करण्यास मजबूर करू शकतो. कारण आधीही काही सिनेमे ओटीटीवर रिलीज झाले आहेत तर काही होणार आहेत. यात आता आणखी एका सिनेमाची भर पडली आहे.

सिनेमाविषयी थोडक्यात…

धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज मिळून निर्मिती करत असलेला हा सिनेमा शरण शर्मा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात जान्हवी कपूर आणि पंकज त्रिपाठी यांच्या व्यतिरीक्त अंगद बेदी, विनीत कुमार, मानव विज हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.