‘त्या’ बारमध्ये अंधाधुंद गोळीबार ; ११ जणांचा मृत्यू

रियो डि जनेरो : वृत्तसंस्था – उत्तर ब्राझिलच्या बेलेम शहरात शस्त्रधारी हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला असून त्यात किमान ११ जण ठार झाले आहेत.

ब्राझिलमधील बेलेम शहरात असलेल्या एका बारमध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला. दुचाकी आणि ३ कारमधून ७ हल्लेखोर आले होते. बारमध्ये येताच हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. त्यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हल्लेखोरांच्या या गोळीबारात ११ जणांचा मृत्यु झाला आहे. त्याबरोबरच अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. असे वृत्त वृत्तवाहिनींनी दिले आहे.