Gunratna Sadavarte | पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर अटकेत असलेल्या सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, पोलीस करणार ‘ही’ मागणी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gunratna Sadavarte | राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) मुंबईतील (Mumbai) निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर अटकेत असलेले अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. मात्र आता पोलिसांनी केलेल्या एका मागणीमुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर आंदोलकांसह सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांची आज पोलीस कोठडी (Police Custody) संपणार असून त्यांना गिरगावमधील (Girgaon) कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दुसरीकडे आता पोलिसांनी सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवून मागणार आहेत.

 

पोलिसांनी रविवारी परेलजवळीक क्रिस्टल टॉवर (Crystal Tower) इथे जावून सदावर्तेंचे सीसीटीव्ही आणि रजिस्टर तपासले. आंदोलनाअगोदर सदावर्ते यांनी कोणाची भेट घेतली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. आंदोलनातील 105 एसटी कर्मचाऱ्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

दरम्यान, पोलिसांनी आणखी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं असून आता न्यायालयाच्या निर्णयात सदावर्तेंना जामीन मिळतो की पुन्हा कोठडी होते ?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Gunratna Sadavarte | After the attack on Sharad Pawars silver oak the police will make this demand

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा