×
HomeशहरअकोलाGunratna Sadavarte On Sharad Pawar | गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर घणाघात; म्हणाले...

Gunratna Sadavarte On Sharad Pawar | गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर घणाघात; म्हणाले – ‘राष्ट्रपती पदासाठी उंची लागते आणि बौद्धिक…’

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Gunratna Sadavarte On Sharad Pawar | राज्यसभा, विधान परिषद निवडणूकीसह आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची (Presidential Election 2022) चर्चा रंगली आहे. एकिकडे विधान परिषदेसाठी रणनीती आखण्याचे काम सर्वच पक्ष करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी विरोधक एकवटले आहेत. विरोधकांच्या आघाडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. परंतु, शरद पवार यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. यानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसे होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावे त्यांच्याकडे कुठली उंची आहे,” असा सवाल करत सदावर्ते यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. ‘कारण राष्ट्रपती पदासाठी उंची लागते त्यामुळे त्यांनीच विचार करावा, या पदावर जायचे की नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले, “मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा होते. आयएएस होण्यासाठीही परीक्षा असते. मला वाटते की, वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे. परंतु राष्ट्रपतीपदासाठी उंची लागते. तसेच बौद्धिक पातळी आवश्यक आहे. शरद पवार यांना चर्चेतून वाजवले जात आहे,” असं म्हणत सदावर्ते यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.

 

Web Title :-  adv gunratna sadavarte criticized ncp chief sharad pawar over presidential election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News