‘सॉरी मम्मी डॅडी मी GST भरू शकलो नाही’ अशी सुसाईड नोट लिहीत त्यानं केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘सॉरी मम्मी डॅडी’ मी  जीएसटी भरू शकलो नाही, म्हणून मी हे जग सोडून जात आहे, मला माफ करा अशी चिट्ठी लिहीत एका अकौंटंटने आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. पंजाबमधील गुरुदासपूर येथील सतिंदर कुमार यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. अविवाहित असलेले सतिंदर कुमार हे अकौंटंटचे काम करत असतं. जीएसटी आल्यानंतर ते जीएसटीचे काम करत असत. त्यांनी हि रक्कम भरण्यासाठी ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, ते त्याने खर्च करून टाकले. यामुळे त्याच्यावर दबाव वाढल्याने  आत्महत्येचे पाऊल उचलले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तपासात हि माहिती समोर आली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला असून तो वैद्यकीय तपासणीसाठी पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मृतकाचे नातेवाईक आले असून पोस्टमोर्टमननंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.

Visit : policenama.com