खा. अभिनेता सनी देओलच्या अडचणीत वाढ, लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल जेव्हापासून गुरदासपुरचा खासदार झाला तेव्हापासून वादविवाद त्याचा पिच्छा सोडत नाहीये. लोकसभेच्या निवडणूकीत अधिक खर्चामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा पातळीवरील निवडणूक देखरेख समितीने हे उघड केले आहे की, सनीने साडे आठ लाख रुपये जास्त खर्च केले आहे. समितीने चौकशीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविला आहे. त्याचबरोबर सनीचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारासाठी ७० लाख रुपयांची मर्यादा निश्चित केली होती. निवडणुकीमध्ये सनीने आठ लाख ५१ हजार रूपये जास्त खर्च केले आहेत. प्राथमिक अहवालात असे दिसून आले आहे की, त्याने निर्धारित मर्यादेवर १८ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. जिल्हा अधिकाऱ्याने सनी देओलला या संदर्भात नोटीस पाठविली होती. सनी देओलच्या वकीलाने नोटीसला उत्तर देत अनेक खर्चाबद्दल प्रश्न निर्माण केले होते. नंतर जिल्हास्तरीय चौकशी समितीने पुन्हा खर्चाचे कॅलक्यूलेशन केले.

असे समजले जाते की, खर्चाच्या प्रकरणाबद्दल समितीने सनीसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये दोन पर्यवेक्षकाव्यतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आणि दोन नोडल अधिकारी देखील सहभागी होते. चौकशीनंतर खर्चामध्ये ९ लाख ७६ हजार जास्त खर्च केले गेल्याचे आढळले.

सनी देओलचे वकील संजय अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, चौकशीमध्ये समिती जास्त खर्च केलेल्या साडे आठ लाख रुपयांचे प्रमाण देऊ शकले नाही. निवडणुकीत अडीच लाख रुपये खर्च करण्याच्या प्रश्नावर विरोधकांनी पुन्हा सनीचे पद रद्द करण्याची मागणी केली. गुरदासपूर येथील लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या नंबरवर असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड म्हणाले की, निवडणूक आयोगाने सनीची सदस्यत्व रद्द करुन आयोग नियमांची पवित्रता जपली पाहिजे.

कॅबिनेट मंत्री सुखजिंदर सिंह रंधवा म्हणाले की निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणे हा एक मोठा गुन्हा आहे. २००७ मध्ये अशाच परिस्थितीत उत्तर प्रदेशचे आमदार उमेश यादव यांना तीन वर्षांसाठी अयोग्य करार देण्यात आला होता. निवडणूक आयोगाने सनी याचे पद रद्द केले पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

You might also like