धक्कादायक ! न्यायाधीशावर ‘लैंगिक’ शोषणाचा खोटा आरोप करण्यासाठी त्याने केला पत्नीचा ‘असा’ वापर

हरियाणा : वृत्तसंस्था – हरियाणामधील गुरुग्राम येथील एक असे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे जे पाहून पोलीसदेखील चकित झाले. पोलीसांनी एका अशा आरोपीला पकडले आहे जो एका न्यायाधीशावर विनयभंगाचा आरोप करण्यासाठी आपल्या पत्नीवर दबाव आणत होता. आरोपीच्या योजनेनुसार त्याच्या बायकोने असे आरोप केल्यानंतर तो न्यायाधीशाला धमकावून वाट्टेल तेवढ्या पैशांची मागणी करणार होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एक महिला जिल्हा सत्र न्यायाधीशांविरोधात तक्रार घेऊन पोलीसांकडे आली. तिने आरोप लावला होता की न्यायाधीशाने तिचे लैंगिक शोषण करून विनयभंग केला आहे. २९ जून रोजी सामूहिक बलात्काराच्या एका प्रकरणात साक्ष नोंदवण्यासाठी ती न्यायाधिशाकडे गेली असताना हा प्रकार घडल्याचा दावा तिने केला होता.

पोलीसांनी या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन या महिलेची सखोल चौकशी केली असता तिने काहीही न सांगता आपल्या वक्तव्यावर आणि आरोपांवर ठाम राहिली. मात्र पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच तिने सगळे सत्य कबूल केले. यानंतर तिने दिलेल्या जबाबात म्हटले आले की, तिचा पती हजार खान (वय ४४) याने तिला न्यायाधीशाविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी बळजबरीने तयार केले होते जेणेकरून याच्या साहाय्याने तो न्यायाधीशाला धमकावून त्याच्याकडून पैसे वसूल करू शकेल.

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

 दाभोलकर, पानसरे यांची हत्या म्हणजे मतभेदाचा ‘आवाज’ बंद करण्यासाठी केलेले कृत्य – न्यायालय

 फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात