Gurmeet Ram Rahim | हत्याप्रकरणात राम रहिमला दिलासा; हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द

हरयाणा : डेरा सच्चा सौदा गुरमीत राम रहिम (Gurmeet Ram Rahim) आणि चार जणांची हायकोर्टाने (High Court) निर्दोष मुक्तता केली आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सीबीआय न्यायालयाचा (CBI Court) निर्णय रद्द करत हायकोर्टाने हत्याप्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता केली. २२ वर्षांपूर्वीच्या या खटल्यात १९ वर्षानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.

सध्या आरोपी गुरमीत राम रहीम हा दोन शिष्यांवरील बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. तर, २०२१ मध्ये रंजीतसिंह हत्या प्रकरणात (Ranjit Singh Murder Case) कट रचण्याच्या आरोपाखाली न्यायालायने राम रहीमसह इतर चौघांना दोषी ठरवले होते. आता पंजाब व हरयाणा उच्च न्यायालायने चारही जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

बलात्कार (Rape Case) आणि दोन जणांची हत्या केल्याप्रकरणी २००९ मध्ये सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख
राम रहिम आणि इतर ४ जणांना दोषी ठरुन शिक्षा सुनावली होती.
त्यानंतर, १८ ऑक्टोबर २०२१ रोजी न्यायालयाने राम रहिमसह इतर चौघांना सन २००२ साली रंजीत सिंह हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्य असलेल्या रंजीत सिंहची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

यासंदर्भाने, राम रहिमने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज हायकोर्टाने राम रहिम आणि आरोपी अवतार सिंह,
कृष्णलाल, जसबीर सिंह आणि सबदिल सिंह यांनाही न्यायालायने शिक्षेतून मुक्त केले आहे.

एका आरोपीचा कोर्ट टड्ढायल सुरु असताना मृत्यू झाला होता. बलात्कार आणि पत्रकार हत्या प्रकरणात राम रहिमचे
अपील उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. सध्या राम रहीम रोहतक येथील तुरुंगात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sonia Doohan on Sharad Pawar NCP | मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, सोनिया दुहान म्हणाल्या, शरद पवार आमचे नेते होते, आहेत, पण सुप्रिया सुळे…

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेले वक्तव्य भोवणार