गुरु पौर्णिमेचं महत्व, अशी करावी उपासना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी महर्षि वेदव्यास यांचा जन्म झाला होता. या दिवसाला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवसात ऋतू परिवर्तन होते. या दिवशी शिष्य आपल्या गुरुची विशेष पूजा करतात. यावेळी दक्षिणा, फूले, वस्त्र इत्यादी भेट दिली जाते. यंदा गुरु पौर्णिमा १६ जुलैला असणार आहे.

सामान्यत: लोक शिक्षण देणाऱ्या शिक्षकालाच फक्त गुरु समजतात, परंतू वास्तावात ज्ञान देणारे शिक्षक म्हणजे अंत्यत सुकूंचित असेल. हिंदू धर्मांत गुरु होण्यासाठी अनेक अटी मानण्यात येतात. ज्यात १३ प्रमुख अटींच्या समावेश असतो.

शुद्धवेषवाह/शुद्धाचारी/सुप्रतिष्ठित/शुचिर्दक्ष/सुबुद्धि/आश्रमी/ध्याननिष्ठ/तंत्र-मंत्र विशारद/निग्रह-अनुग्रह/शांत/दान्त/कुलीन/विनीत यांचा समावेश होतो. गुरुची प्राप्ति झाल्यानंतर त्यांच्या दिशा निर्देशाचे पालन केले पाहिजे.

कशी करावी गुरुची उपसना –

१. गुरुला उच्च आसनावर बसवावे.
२. गुरुचे चरण पाण्याने धुवावे आणि पुसावे.
३. त्यानंतर त्यांच्या पायावर पांढरी फुले अर्पित करावे.
४. त्यानंतर त्यांना पांढरे किंवा पिवळे वस्त्र द्यावेत.
५. गुरुला फळ, गोड अन्न आणि दक्षिणा अर्पित करावी.
६. गुरुची प्रार्थना करावी.

जर तुमचे गुरु नसेल तर –

१. प्रत्येक गुरुच्या मागे गुरु सत्ताच्या रुपात शंकर मानले जातात.
२. जर गुरु नसेल तर शंकराला गुरु मानून गुरु पौर्णिमेच्या दिवशी पुजावे.
३. श्रीकृष्णाला गुरु मानून तुम्ही त्यांची देखील पुजा करु शकतात.
४. त्यांना फुले, गोड अन्न आणि दक्षिणा अर्पण करा.

आरोग्यविषयक वृत्त

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या