गुरू रंधावा काश्मीरमध्ये करत होता शुटींग, अचानक यायला लागलं नाकातून रक्त ! चाहते चिंतीत

पोलिसनामा ऑनलाईन – पंजाबी सिंगर आणि अ‍ॅक्टर गुरू रंधावा (Guru Randhawa) आपल्या गाण्यांमुळं कायमच चर्चेत येताना दिसत असतो. अलीकडेच त्याचं मेहंदी वाले हाथ गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात त्याच्या सोबत संजना संघी दिसली होती. सध्या गाणं खूप चर्चेत आहे. अशात आता गुरू रंधावाचा असा फोटो समोर आला आहे जो पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे. या फोटोत त्याच्या नाकातून चक्क रक्त येताना दिसत आहे.

गुरूनं त्याच्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे. सध्या या फोटोची खूप चर्चा होताना दिस आहे. त्याच्या नाकातून रक्त येताना दिसत आहे. हा फोटो समोर येताच चाहत्यांना चिंता वाटू लागली की, गुरूच्या नाकातून रक्त का येत आहे.

गुरूनं फोटो शेअर करतानाच याचं कारणही सांगितलं आहे. हा फोटो तेव्हाचा आहे जो काश्मीरमध्ये शुटींग करत होता. यावेळी काश्मीरमध्ये थंडी एवढी जास्त होती की, गुरूच्या नाकातून रक्त येऊ लागलं. गुरूच्या मते त्यावेळी तापमान 9 डिग्री सेल्सियस होतं. त्यामुळं त्याची अशी स्थिती झाली होती. त्याच्या नाकातून रक्त येऊ लागलं. हे पाहून आधी त्यालाही काळजी वाटत होती.