Video : नोरा फतेहीच्या ‘या’ अदांवर गुरू रंधावा झाला फिदा, म्हणाला – ‘तुम पावर हाउस हो’

मुंबई : आपल्या जबरदस्त नृत्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नोरा फतेही आजकाल तिच्या ‘नच मेरी रानी’ या नवीन गाण्यामुळे चर्चेत आहे. गुरु रंधावाच्या या गाण्यात नोरा नृत्य करत आहे. या गाण्याची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा होती. प्रत्येकाला पुन्हा एकदा नोरा फतेहीचे ठुमके आणि गुरु रंधावाची चमकदार शैली बघायची होती. या कारणामुळे रिलीजबरोबरच हे गाणे सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.

19 ऑक्टोबर रोजी टी-सिरीजद्वारे यूट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या या गाण्याचा व्हिडिओ आतापर्यंत 40 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. दरम्यान, गुरु रंधावाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नोराच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आणि त्याचे कौतुक केले. गुरूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नोरा कोरियनोग्राफर आदिल खानसोबत ‘नांच मेरी राणी’मध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. नोराच्या या नृत्यावर फिदा गुरू म्हणाले, ‘नोरा फतेही तू पॉवर हाऊस’.

 

 

 

 

 

 

 

गुरु रंधावाचे गाणे ‘नांच मेरी राणी’ हे ऐकल्यानंतर कोणालाही डान्स करू वाटेल, हे ऐकून लीरिक्स, डान्स स्टेप्स आणि संगीत यांचा परिपूर्ण कॉम्बो आहे. गाण्यात नोराला पहिला रोबोट म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे या गाण्यात रोबोटिक्स नृत्यही पाहायला मिळाले आहे.

You might also like