Guru Sri Ganeshan Passed Away | भरतनाट्यम गुरू श्री गणेशन यांचं निधन, मंचावर नृत्य करताना कोसळले; वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाइन –  Guru Sri Ganeshan Passed Away | भरतनाट्यचे लोकप्रिय गुरू आणि वादक श्री गणेशन यांचं निधन झालं आहे. ओडियामधील भुवनेश्वर येथील एका सांस्कृतिक प्रोग्रामदरम्यान नृत्य सादर करताना ते स्टेजवर अचानकपणे कोसळले. त्यांना तात्काळ हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ते 60 वर्षाचे होते. (Guru Sri Ganeshan Passed Away)

 

ट्विटर पहाण्यासाठी क्लिक करा

 

 

मलेशियातील क्वाआलांलंपुर येथील श्री गणेशालयाचे ते संचालक होते. भुवनेश्वरमध्ये त्यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरविण्यात येणार होते. गीत गोविंदावर आधारित भरतनाट्यम करत असताना ते स्टेजवर कोसळले. ते मुळचे मलेशियाचे असून ते भरतनाट्य सादर करण्यासाठी भारतातील भुवनेश्वर येथे आले होते. आयोजक जगबंधु जेना यांदी दिलेल्या माहितीनुसार, ते ज्यावेळी भुवनेश्वरला आले होते त्यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती. त्यांनी नृत्य देखील सादर केलं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं निधन हे ह्दय विकाराच्या झटकयाने झाले आहे.

 

Web Title :  Bharatanatyam dance Guru Sri Ganeshan Passed Away in bhubaneswar Odisha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा