जुळ्या बहिण-भावानं 10 वीत केलं ‘टॉप’, सर्व विषयांमध्ये मिळविले सारखेच ‘मार्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जुळ्या मुलांत समान चेहरा, समान सवयी अशीच प्रकरणे आपण ऐकली असतील. परंतु आपण कधीही ऐकले आहे की जुळ्या मुलांचा मेंदू देखील समान कार्य करतो. मात्र, गुरुग्राममधील एका खासगी शाळेत शिकणार्‍या जुळ्या भावंडांच्या जोडीने हा चमत्कार केला आहे. सायबर सिटीच्या निर्वाण कंट्रीमध्ये राहणारी आनंदिता आणि आदित्यने सीआयएससीई बोर्डाकडून दहावीची परीक्षा दिली आणि दोन्ही भावंडांनी या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या दोघांनीही समान गुण घेऊन सर्वांना चकित केले.

मोठी बहीण आनंदिताने दहावीच्या परीक्षेत 99.2 टक्के गुण मिळवले आहेत तर भाऊ आदित्यनेही 99.2 टक्के गुण मिळवले आहेत. या दोघांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार आनंदिता आणि आदित्यच्या जन्मामध्ये केवळ 2 मिनिटांचा फरक आहे. आनंदीता लहानपणापासूनच आदित्यची मोठी बहीण म्हणून काळजी घेते. एवढेच नव्हे तर एकसारखे मार्क्स मिळवून या मुलांनी पूर्वीही असेच सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.

एवढेच नव्हे या जुळ्या भावंडांनी सर्व विषयांत समान गुण मिळवले आहेत. कुटुंबाच्या मते, सर्व विषयांत समान संख्या आणणे हे एक दिव्य आशीर्वाद असल्यासारखे दिसते कारण जुळ्या मुलांमध्ये इतकी समानता कशी असू शकते. अर्थात जुळ्या भाऊ-बहिणींनी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे परंतु त्यांची विचारसरणी खूप वेगळी दिसते. आनंदिताने एक संशोधक होण्याचे स्वप्न पाहिले आहे. दुसरीकडे, आदित्यला संगणक अभियंता व्हायचे आहे.