रस्त्याच्या कडेनं जात होत्या मुली, ‘छेडछाड’ करून ‘अश्लील’ इशारे करणारा मॅनेजर गोत्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुग्राम येथील सायबर सिटीच्या पॉश परिसरात अनेक मुलींसोबत छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत गुरुग्राम पोलिसांनी कारवाई करत जवळच्याच एका कंपनीतील सुविधा पुरवणाऱ्या मॅनेजरला ताब्यात घेतले आहे.

मॅनेजरच होता आरोप
छेडछाडीप्रकरणी अटक केलेला युवक एमबीए झालेला आहे आणि एका खाजगी कंपनीमध्ये सुविधा मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अतुल आपल्या चारचाकी गाडीमधून जाऊन महिलांना आणि तरुणींना छेडत असे आणि अश्लील इशारे करत असे. याबाबतच्या अनेक तक्रारी देखील पोलिसांकडे आल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
छेडछाड झालेल्या तरुणींनी तक्रार करताना पोलिसांना सविस्तर तपशील सांगितलं होता. त्यावरून पोलसांनी स्कॉर्पियो गाडीला सेक्टर 14 च्या लोकेशनवर पाहिले आणि गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. अतुल आचार्यपुरी हा गुरुग्राम येथील रहिवासी आहे.

अनेकदा छेडछाड सारख्या प्रकरणांना कोणी गांभीर्याने घेत नाही परंतु अशा प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याबाबत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे क्राईमच्या एसीपीनी सांगितले.

त्यातच गुरुग्राम येथे ऍक्सिस बँकेचे एटीएम चोरल्याची घटना समोर आली आहे. 22 डिसेंबर रोजी झालेल्या या घटनेत 18 लाख रुपयांची लूट चोरट्यांकडून करण्यात आलेली आहे.चोरटे अद्याप फरार असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/