काय सांगता ! होय, फ्लॅटची किंमत 7 लाख पण विजेचं बिल 77.31 लाख, वीज विभागाचा प्रताप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्या दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना हरियाणामध्ये घडली आहे. सात लाख किंमत असलेल्या फ्लॅटचं बिल तब्बल ७७ लाख आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, ४ जानेवारीपर्यंत बिल भरण्याची नोटीस देण्यात आली असून यानंतर वीज बिल न भरल्यास सुमारे २.२४ लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. याआधीही चुकीचं वीज बिल आलं असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे एका हिंदी वेबसाईटने वृत्त दिले आहे.

विजेच्या मीटरचं रीडिंग दाखल केलेल्या दक्षिण हरियाणा वीज वितरण निगमकडून (डीएचबीवीएन) ग्राहकांना विजेचं बिल पाठवलं जात आहे. सेक्टर ५७ मधील हाऊसिंग बोर्डाच्या ईडब्ल्यूएस कॉलनीतील घर क्रमांक 373 च्या तळ मजल्यावर गोपाळ राम राहतात. त्यांना दोन महिन्याच तब्बल ७७.३१ लाख रुपये विजेचं बिल आलं आहे. एवढाच नाही तर ४ जानेवारीपर्यंत बिल भरण्याची नोटीसही देण्यात आली आहे. यानंतर वीज बिल न भरल्यास सुमारे २.२४ लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. असे या नोटिसीत म्हंटल आहे.

त्याचबरोबर फ्लॅट नंबर ३७२ जीएफ रहिवासी हुकम सिंह यांचे विजेचे बिल सुमारे ४७ हजार रुपये आले आहे. तर फ्लॅट नंबर १८२ च्या तळमजल्यावर छत्रपाल अरोडा राहतात. त्यांना ९९ हजार रुपये विजेचं बिल आलं आहे.

शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या शेतकऱ्याला २६ लाखांच बिल

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. उन्नावमधील वीज विभागाच्या कारनाम्यांमुळे हजार, बाराशे नाही तर शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला तब्बल २६ लाखांचं विजेचं बिल आल्याची अजब घटना समोर आली होती. बिल पाहून शेतकऱ्याच्या कुटूंबाला धक्का बसला होता. रामू राठोड असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

त्यांचे गंगा घाट पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा गावात घर आहे. वीज आल्यापासून ते वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीही तयार नाही. स्वतःची जमीन नाही आणि पाच मुलींचं लग्न करायचं आहे. मला २६ लाख रुपयांचं बिल कसं आलं हे काहीच कळत नाही. अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं तर ते केवळ आश्वासनं देत आहेत, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही असं रामू राठोड यांनी म्हटलं होतं.