डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात गुरूपौेर्णिमा उत्साहात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – आकुर्डी येथील डॉ.डी.वाय.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमासाठी प्रा.वसंत पोखरकर यांना आंमत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ.मुकेश तिवारी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचे पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देवून आभार व्यक्त केले. तर काही विद्यार्थ्यांनी मनोगताच्या माध्यामातून कृतज्ञता व्यक्त केली.

वसंत पोखरकर यांनी गुरूपौर्णिमा पुराणापासून का साजरी केली. याविषयी विद्यार्थ्यांना माहीती सांगितली. गुरूनी जो ज्ञानरूपी वसा दिला आहे. तो विद्यार्थ्यांनी पुढे चालु ठेवताना प्रामाणिकपणा आत्मसात करावा असे त्यांनी सांगितले. क्षितीजा देव व सुमित जैसवाल यांनी सूत्रसंचालन केले. ऋचिता काळे हिने आभार मानले.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like