बीडमध्ये परराज्यातून आलेला ३० लाखांचा गुटखा जप्त

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

परराज्यातून एका टेम्पोमध्ये आणलेला गोवा गुटखा बीड ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. गेवराई हद्दीतील शिंदे पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई कारण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

दीपक सुरेश वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बीड ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना हैद्राबाद येथून औरंगाबाद येथे एका टेम्पोमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने गेवराई हद्दीमध्ये शिंदे पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. त्यावेळी हैद्राबादच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला थांबवून टेम्पोची तपसणी करण्यात आली. टेम्पोमध्ये ३० लाख रुपयांचा अवैध गोवा गुटखा आढळून आला. पोलिसांनी टेम्पोसह गुटखा जप्त करुन टेम्पो चालकाला अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, पोलीस उपअधीक्षक कलुबर्मे  यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

[amazon_link asins=’B078HYJSS3,B075K83QJK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc21ab60-ab74-11e8-90d4-25fce8cc1efe’]