‘या’ तालुक्यात गुटखा विक्री चालते ‘सरेआम’

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सगळीकडे गुटखा बंदी असताना भोकर तालुक्यामध्ये मात्र गुटख्याची राजरोसपणे विक्री होत आहे. गुटख्याच्या अवैध्य विक्रीवर पोलीस प्रशासन सुद्धा गप्प आहे. अनेक सामाजिक संघटनांनी गुटखा बंद करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे गुटखा बंदीतून भोकर तालुक्याला वगळण्यात आले की काय, या चर्चेला उधाण आले आहे.

भोकर शहर अवैध्य गुटखा विक्रीचे केंद्र बनलेला आहे. हा गुटखा शहरात असलेल्या सरकारी कार्यालय, शाळा आणि महाविद्यालया लगत असलेल्या पानठेल्यावर अगदी सहजतेने कोणत्याही वयोगटातील मुले आणि पुरुषांना मिळत आहे. तालुक्यातील भोसी, मोघाळी, किनी, पाळज, पांडुरणा, रिठा, लगळुद, पिंपळढव, सोनारी, रेणापूर, बटाळा या गावांना मोटारसायकलवरून वाहतूक करून दररोजच्या दररोज गुटखा कमी पडू न देण्याचे काम भोकर येथील काही होलसेल दुकानदार नित्य नियमाने पार पाडत आहेत.

तरुणीस डांबून ठेवून पोलीस पुत्राने केला बलात्कार

मागील सहा महिन्यांपासून शहरातील प्रत्येक पानठेल्यावर “वजीर” नावाचा गुटखा खायला आणि पहायला मिळतो. गुटख्यामुळे अगदी अल्पदरात तोंडाचा कॅन्सर अन्न व औषधी प्रशाषणाच्या आशीर्वादाने आणि गुटखा माफियांच्या आशीर्वादाने तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध होत आहे.

अवैध गुटखा व्यापारी किनवट रोड, समता नगर, मुदखेड रोड, सईद नगर भागात माल साठवला जातो परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. प्रशासनापर्यंत ही खबर अद्याप कशी गेली नाही याबाबत नागरीकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

सोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा गजाआड 

सकाळच्या वेळेस गुटखा पार्सल करून स्कुटी व मोटार सायकलने माल विक्रीसाठी पार्सल करण्यात येतो. किनवट, हिमायतनगर, मुदखेड येथील मुख्य व्यापारी असलेली चर्चा सध्या भोकर च्या भागात सुरू आहे. अनेक सामाजिक संघटनांनी गुटखा बंद करण्यासाठी प्रयत्न केले पण आता त्यांनी देखील हात टेकले आहेत. किती तक्रारी द्यायच्या ह्याबद्दल देखील उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

या सर्व घटना माहित असून सुद्धा पोलीस प्रशासन सुद्धा गप्प आहे. अधिकाऱ्यांना हजारोची माया दिल्याने अधिकारी गप्प आहेत का ? अशी चर्चा भोकराच्या नागरिकांमध्ये  चालू आहे. त्यामुळे अवैध गुटखा विक्रीबद्दल आता नेमकी कोणाकडे तक्रार करावी असा प्रश्न  भोकरच्या अनेक नागरिकांना सतावत आहे.