विशेष पथकाकडून अडीच लाखाचा गुटखा जप्‍त

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – अप्पर पोलीस अधीक्षकांनी नव्यानेच स्थापन केलेल्या विशेष पथकाने छापा टाकून तब्बल 2 लाख 43 हजार 552 रूपये किंमतीचा गुटखा जप्‍त केला आहे. ही कारवाई सटाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंजवाड शिवारात करण्यात आली आहे.
पोलिसांनी जप्‍त केलेला मुद्देमाल हा अन्‍न सुरक्षा अधिकारी सोनवणे आणि पी.एस. पाटील यांच्या ताब्यात दिला. याबाबतची पुढील कारवाई सटाणा पोलिस करीत आहेत. मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी नव्यानेच विशेष पथकाची स्थापना केली आहे. पोलिस उपनिरीक्षक ए.बी. क्षीरसागर, पोलिस हवालदार ठोके, पोलिस नाईक भिलावे, देवरे, कर्मचारी माळी आणि दासरवार यांना गुटख्याबाबत बातमीदाराकडून गुप्‍त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. विशेष पथकाने शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सुटाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंजवाड शिवारातील प्रकाश तुकाराम जाधव यांच्या घरातील पाठीमागील खोलीत अख्तर साबीर तांबोळी (22, व्यवसाय – भारत जनरल स्टोअर्स) याच्याकडे असलेला गुटखा, सुगंधी तंबाखु, पान मसाला असा एकुण 2 लाख 43 हजार 552 रूपये किंमतीचा माल जप्‍त केला आहे. विशेष पथकातील पोलिसांनी अख्तर साबीर तांबोळी याच्यावर कारवाई केली असुन मुद्देमालासह त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याबाबत सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असाहे. गुन्हयाचा पुढील तपास सटाणा पोलिस करीत आहेत.

जाहिरात