धुळे : गुटखा तस्करी करणाऱ्या चालकास शिरपुर पोलीसांकडून अटक ; कंटेनरसह ७ लाखांचा गुटखा जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शिरपूर तालुका पोलीसांनी लाखों रुपयांचा गुटखासह कंटेनर व चालकाला अटक केली. सविस्तर माहिती की, शिरपुर तालुका स.पो.नि. अभिषेक पाटील यांना खबरी मार्फत मिळालेल्या माहिती नुसार मुंबई आग्रा माहामार्गावरील एका हॉटेल जवळ कंटेनर मधुन गुटखा भरुन तो विक्री करण्यास चालक येऊन थांबणार आहे.

शिरपूर पोलीसांना माहिती मिळताच महामार्गावरील चेक पोस्ट हाडाखेड नाका जवळील हरियाणा मेवात हॉटेल येथे तपासणी दरम्यान मोकळ्या जागेवर कंटेनर अडोशाला उभा असलेला दिसला. कंटेनर मधुन गुटखाच्या वास येत होता. परराज्यातून गुटखा भरलेला कंटेनर क्रं. आर जे 14 जीएच 3946 चालकास विचारपूस केली असता तो योग्य ती माहिती देत नसल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला. कंटनेरची तपासणी केली असता कंटेनर मधील आतील भागात विविध वस्तूचे खोक्याच्या आडोशाला सुंगधित जाफरानी तंबाखु जर्दा व गुटखाजन्य पानमसाला मोठ्या प्रमाणात आढळुन आला.

कारवाई करण्यासाठी सहा. अन्न सुरक्षा पथकासह शिरपूर पोलीस ठाण्यात आले. ताब्यात घेतलेल्या सुगंधी गुटखाची तपासणी केली असता कंटेनर सह त्यात मिळालेला मुद्देमाल प्रिमियम राजनिवासी सुगंधित पानमसाल्याचे पांढऱ्या रंगाच्या 17 गोण्या व एन पी – 1 जाफरानी जर्दा 40 गोण्या एकुण माल किंमत 7 लाख 16 हजार 448 रुपयेचा, कंटेनर आर जे 14 जी एच 3946 क्रमांक असलेला किंमत 20 लाख रुपये असा एकुण 27 लाख 16 हजार 448 मुद्देमाल जप्त केला.

चालक सहोनसिंग ब्रिजलाल वय. 35 रा.गोटाणी ता. खुरजा जि. बुलंद उत्तरप्रदेश याचे विरुध्द भा.द.वि.कलम 328, 272, 273, 188 अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 चे कलम 26 (2), 27, 30(2)(a) सह 26 (2) iv प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी माने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक पाटील, पोसई योगेश ढिकले, पो ना संजय जाधव, पो.कॉ.योगेश मोरे, योगेश दाभाडे, महालेनी कामगीरी केली आहे.

Loading...
You might also like