इंदापूरात 1 लाख 27 हजाराचा गुटखा पकडला, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर शहराच्या मध्यवस्तीतील बाजारपेठेत खुलेआम व राजरोसपणे अवैध गुटखा विक्री करणार्‍या दोन दुकाणांची तपासणी शुक्रवारी दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी पूणे विभाचे अन्न व औषध प्रशासन,अन्नसुरक्षा अधिकारी यांनी केली असता सदर दुकानात 1 लाख 27 हजार 388 रूपयांचा अवैध गुटखा सापडला आहे. या कारवाईने इंदापूर तालुक्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. तर याबाबतची फीर्याद शुभांगी बाळकृृष्ण अंकुश (वय42) रा.सिंहगड रोड,पूणे-51 यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.

पदमाकर नरहरी तांदुळकर (वय ४७), रा.कसबा इंदापूर, जि.पूणे. व अजिज नूरमहंमद मोमीन (वय ५३), रा.कसबा, इंदापूर,जि.पूणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फीर्यादीत म्हटले आहे की इंदापूर शहरातील कसबा, कचेरी रोड येथे मेसर्स राज सुपर मार्केट या दुकानाची अन्नसुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली असता सदर दुकानात अवैध गुटख्याचा मोठा साठा आढळुन आला.यामध्ये विमल पान मसाला(ब्ल्यु) 358 पकेट किंमत 42 हजार,690 रूपये, व्ही वन तंबाखु (ब्ल्यु) 468 पकेट किंमत 14 हजार 40 रू,विमल पान मसाला (लाल) 67 पकेट, किंमत 12 हजार 529 रू, व्ही वन तंबाखु (लाल) 67 पकेट किंमत 2 हजार 09 रू, आर एमडी पान मसाला 42 पकेट,किंमत 30 हजार 240 रू, एम सेटेंड तबाखु 42 पकेट, किंमत 12 हजार 600 रू,विमल पान मसाला (किंग) 28 पकेट किंमत 5 हजार 544 रू, व्ही वन तंबाखु (किंग) 28 पकेट, किंमत 6 हजार 161 रू,असा एकुण १ लाख, २० हजार,९३८ रूपये किमतीचा अवैध गुटखा मीळुन आला.

तर शुक्रवारी दिवशी सायंकाळी ७ वा. चे सुमारास नेहरू चौक कचेरी रोड, कसबा येथील राज हाॅटेलमध्ये तपासणी केली असता तेथे विमल पान मसाला 43 पकेट किंमत 5 हजार 160 रू, व्ही वन तंबाखु 43 पकेट किंमत 1 हजार 290 रू. असा एकुण 6 हजार 450 रू.किमतीचा अवैध गुटखा आढळुन आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदरचा माल वरील दोघांनी कोणाकडुन आणला याबाबत काहीही माहीती न सांगीतल्याने वरील दोन जणांवर अन्न व सुरक्षा विभाग पूणे यांचेकडुन अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 चे उल्लंघन केल्याचा गुन्हा इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमुद केले असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.