वाघोलीत 3 लाख 42 हजाराचा गुटखा जप्त, लोणीकंद पोलिसांची कारवाई

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन – लोणीकंद गुन्हे शोध पथकाने पुणे अहमदनगर महामार्गावरील वाघोली गावचे हद्दीत कोरोना साथीच्या रोगाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या आदेशाने खाजगी वाहनाने गस्त घालत असताना एक व्यक्ती लाल रंगाच्या बजाज कंपनीची सी टी 100 मोटारसायकल क्र MH12NY9030 वर एक काळया रंगाची बॅग घेऊन एस टी कॉलनी येथून महामार्गावर विक्रम डेअरी समोरून येत असताना दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास थांबवून त्याचेजवळील बॅग ची चैन खोलून पाहणी केली असता त्यामध्ये पानमसाला, विमल, आर एम डी इत्यादी चे पॅकेट असल्याचे दिसून आले. त्यास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव वसीम आक्रम मलिक वय 28 वर्षे, रा. एस टी कॉलनी, वाघोली, पुणे मूळ रा. हसुपुरा,बिजनुर, उत्तरप्रदेश असे सांगितले. त्याच्याकडे अधीक विचारणा केली असता त्याने हा माल युसुफ नासिर अन्सारी रा. भावडी रोड, वाघोली, पुणे याचेकडून घेतल्याचे सांगितले.यावर त्यास सोबत घेऊन युसुफ अन्सारी याच्या घरी जाऊन पाहणी केली असता त्याचे घराखली आणखी एक व्यक्ती संशयित रित्या मिळून आला त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सलीम अब्दुलखाली मलिक वय 39 वर्षे, रा. भावडि रोड, वाघोली,पुणे मूळ रा. सराई डाई, राजापूर, कोतवाली, उत्तरप्रदेश असे सांगून तो युसुफ अन्सारी याचे सांगण्यावरुन वरून पानमसाला, विमल, आर एम डी इत्यादी विकण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. युसुफ अन्सारी याच्या घराची तपासणी केली असता तेथे केशर युक्त पानमसाला, विमल, व्हि 1 तंबाखू, आर एम डी, सेंटेड गोल्ड तंबाखू, राज निवास पानमसाला, एन पी 10 जर्दा जाफरानी व एक मोटार सायकल असा एकूण 3,42,462रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.

अलिकडे पूर्व हवेलीतील सर्वत्र गुटखा सर्रासपणे विकला जातो यावर कोणाचेच लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे किरकोळ कारवाई केली जाते याला नक्कीच चांगले आशिर्वाद असल्याने हा व्यवसाय विनादिक्कत चालू आहे.

You might also like