प्रियकराने दिला मुलगी बनून प्रेयसीचा पेपर अन घडली अद्दल…

वृत्तसंस्था : प्रेमात सर्वकाही माफ असते असे म्हटले जाते. प्रेमी युगुल एकमेकांकरिता काहीही करायला तयार असतात. पण एका पठ्ठ्याने चक्क प्रेयसीला परीक्षेचे टेन्शन आले म्हणून स्वतः मुलीचा वेष करून परीक्षा द्यायला बसला. त्याचं दुर्दैव असं की तो पकडला गेला आणि या २० वर्षीय तरुणाला तब्बल २३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. प्रेयसीला मदत करणे त्याला चांगलेच महागात पडले.

काझाकिस्तानमधील आयन झेडडोव्ह असे या मुलाचे नाव आहे. मुलीचे कपडे घालून आपल्या प्रेयसीच्या जागी परिक्षा केंद्रात पेपर देण्यासाठी गेला. कझाकिस्तानमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यापिठामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी देशातील सर्व विद्यार्थ्यांची एक प्रवेश परिक्षा घेतली जाते. याच परिक्षेमध्ये आयनने हा प्रताप केला मात्र तो पकडला गेला.

मुलीच्या आवाजात बोलायला गेला आणि अडकला
आयन परिक्षा केंद्रामध्ये मुलीची वेशभूषा करुन गेला. काळ्या रंगाच्या केसांचा विग, पाढऱ्या रंगाचे टीशर्ट आणि राखाडी रंगाचा स्कर्ट घालून तो पेपर देण्यासाठी गेला. इतकचं नाही तर कोणाला संक्षय येऊ नये म्हणून त्याने मुलींप्रमाणे मेकअपही केला होता. मात्र हुशार पर्यवेक्षकांनी पेपर देण्यासाठी आलेली व्यक्ती आणि नोंदणी करण्यात आलेली व्यक्ती वेगळी असल्याचं लगेच ओळखलं. संक्षय आल्याने आयनला वर्गाबाहेर चौकशीसाठी नेण्यात आले तेव्हाही त्याने मुलीच्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही फसल्याने त्याचे बिंग फुटले. मुलीच्या ऐवजी तिचा प्रियकर परिक्षेसाठी आल्याचे समजल्यानंतर शिक्षकांनाही धक्काच बसला. ‘आधी आम्हाला त्या मुली ऐवजी कोणीतरी वयाने मोठी मुलगी परिक्षा देण्यासाठी आली असं वाटलं. पण ती मुलगी नसून मुलगा आहे याचा आम्ही विचारही केला नव्हता. तो बोलेपर्यंत आम्ही त्याला मुलगीच समजत होतो’, असे मत एका शिक्षिकेने व्यक्त केले आहे.

प्रेमवीराला सपोर्ट
आयनला एक लाख २३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. एकीकडे या प्रकरणावरुन टिका होत असतानाच या प्रेमविराला पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ओल्जहॅस या उद्योजकाने तर दंडाची अर्धी रक्कम भरण्याची तयारीही दर्शवली आहे. प्रेम आजही जिंवत असून ते सिद्ध करायला लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच या घटनेतून दिसून आल्याने आपण दंडाची अर्धी रक्कम भरण्यास तयार असल्याचे हा उद्योजक म्हणाला. स्थानिकांनी तर या मुलाला ‘रोमॅन्टीक ऑफ द इयर’ अशी मजेशीर उपमाच दिली आहे. या मुलाला दंड ठोठावून सोडण्यात आले असले तरी त्याच्या १७ वर्षीय प्रेयसिला आता थेट पुढील वर्षी ही प्रेवश परिक्षा देता येणार आहे.