ग्वाल्हेरमध्ये ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे 2 जणांचा मृत्यू, जयारोग्यमध्ये हाहाकार, मंत्र्याने जोडले हात

ग्वाल्हेर : वृत्त संस्था – ग्वाल्हेरच्या जयारोग्य हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशीरा ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे 2 कोविड रूग्णांचा मृत्यू झाला. यानंतर तिथे मोठा गोंधळ उडाला. 65 वर्षांचे राजकुमार बन्सल आणि 75 वर्षांचे फुंदन हसन यांना ऑक्सीजन संपल्यानंतर शिफ्टिंग केले जात होते. याच दरम्यान त्यांचा श्वास थांबला.

जिल्ह्यातील सर्वात मोठे जयारोग्य हॉस्पिटल सध्या ऑक्सीजनच्या टंचाईला तोंड देत आहे. येथील आयसीयुमध्ये प्रचंड हाहाकार उडाला आहे, लोक अस्वस्थ आहेत. शनिवारी रात्री उशीरा ऑक्सीजनची कमतरता होताच गोंधळ उडाला. अटेंडर आपल्या रुग्णांना स्ट्रेचरवर व्हेंटीलेटरसह दगडी इमारतीकडे पळाले. शहरातील 80 सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 2055 रूग्ण दाखल आहेत, यापैकी 1009 रूग्णांना ऑक्सीजन सपोर्ट दिलेला आहे. रोज 3000 सिलेंडर संपत आहेत.

रात्रभर थांबले मंत्री आणि अधिकारी
इकडे रूग्णांच्या मृत्यूचे वृत्त येताच ऊर्जा मंत्री प्रदुम सिंह सुद्धा जयारोग्य येथे आले. तोमर रात्रभर ग्वाल्हेरच्या ऑक्सीजन सिलेंडरच्या व्यवस्थेसाठी उभे होते. त्यांनी रात्री 3 वाजता महाराजपुरा प्लँटमधून स्वता ऑक्सीजन सिलेंडर हॉस्पिटलला पाठवले. या दरम्यान कलेक्टर, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगर निगम आयुक्त सुद्धा ऑक्सीजन प्लँटमध्ये उपस्थित होते. तोमर यांनी म्हटले – ऑक्सीजनचा क्रायसिस आहे. त्यांनी गॅस संचालकांना हात जोडून रूग्णांसाठी ऑक्सीजन देण्याची विनंती केली.