सह्याद्री वाहिनीवर सोमवारपासून 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानगंगा’ कार्यक्रम प्रसारित होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्य शासनाकडून येत्या सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ( Doordarshan’s Sahyadri channel) ज्ञानगंगा ( Gyanganga) या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे. पहिल्या सत्राच्या शेवटच्या आठवड्यात शैक्षणिक कार्यक्रम सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कोरोनाच्या ( Corona) संकटकाळात राज्यातील शाळा ( School) व कॉलेज ( Collage) बंद असल्याने विद्यार्थांना शिक्षण घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षणाचा ( Online Education) पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे सोमवारपासून दररोज सकाळी ७.३० सात ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ज्ञानगंगा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्यात येणार आहे. १५ जून पासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या ठिकाणी शिक्षक प्रत्यक्ष गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्यामुळे तसेच राज्य सरकारकडून राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एमकेसीएल ( MKCL) आणि राज्य परिषदेच्या सहकार्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’( Tili Mili ) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. परंतु, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही शैक्षणिक कार्यक्रम अद्याप तरी सुरु झाला नव्हता.

आपल्यासाठी अभ्यासक्रम कधी सुरु होणार याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्यक्रमाची प्रतीक्षा संपणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad) यांच्याकडून ज्ञानगंगा कार्यक्रम सुरू करण्याबाबतची माहिती ट्वीटरद्वारे देण्यात आली आहे.