Gyanvapi Masjid Case | ज्ञानवापी मशीद प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित – सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gyanvapi Masjid Case | ज्ञानवापी मशिदीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरण (Gyanvapi Masjid Case) आता जिल्हा न्यायालयाकडे (District Court) वर्ग करण्यात आले आहे. याबाबत आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहे. सुप्रीम कोर्टाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आला आहे. हे प्रकरण प्रथम जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायाधीश (District Judge) करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

काही दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Masjid Case) वाद सुरू आहे. या मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा सर्वेक्षण आयोगाने केला होता. मात्र, आज (शुक्रवारी) याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली आहे. यावेळी न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश देत. यापूर्वी दिलेला आदेश कायम राहील, असं म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार, माध्यमांमध्ये लीक होत असलेल्या गोष्टींबाबतही न्यायालयाने खडेबोल सुनावले आहे. सर्वेक्षणाचा अहवाल लीक होता कामा नये. हा अहवाल थेट जिल्हा न्यायालयात सादर करावा, असं बजावलं आहे. विवादाची सुनावणी जिल्हा न्यायाधीशांनी करावी असे आमचे मत आहे. आम्हाला वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्याने या प्रकरणाची सुनावणी करावी अशी आमची इच्छा आहे. कारण हा कायदेशीररित्या महत्त्वाचा विषय आहे.

 

दरम्यान, वाराणसी न्यायालयाचा (Varanasi Court) निर्णय अवैध ठरवा, अशी मागणी करणारी याचिका मुस्लिम पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात केली होती.
सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षकारांनी हिंदू पक्षकारांवर आरोप केले आहे.
हिंदू पक्षकारांकडून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
500 वर्षांपासून प्रचलित असलेली धार्मिक पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मुस्लिम पक्षकारांनी केला आहे.

 

Web Title :- Gyanvapi Masjid Case | gyanvapi mosque case transfer to district court says supreme court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा