Gyanvapi Masjid Surve | ज्ञानवापी मशीद सर्व्हे प्रकरणात 2 मोठ्या घडामोडी; जाणून घ्या

वाराणसी : वृत्तसंस्था – Gyanvapi Masjid Surve | उत्तर प्रदेशाच्या वाराणसी (Varanasi) येथील काशी विश्वनाथ मंदिराजवळच उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदी प्रकरणी (Gyanvapi Masjid Surve) कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा (Ajay Mishra) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व्हेचा अहवाल सादर करण्यासाठी 2 दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. वाराणसी सत्र न्यायालयाने (Varanasi Sessions Court) हे आदेश दिले आहेत.

 

आज (मंगळवारी) सर्वेक्षणाचा रिपोर्ट कोर्टात सादर केला जात आहे. या 3 दिवसामध्ये हजारो फोटो आणि व्हिडिओग्राफ पुरावे म्हणून एकगठ्ठा करण्यात आल्या आहेत. आज सर्वोच्च कोर्ट कमिश्नर हे सर्व पुरावे सादर करणार होते परंतु, सहाय्यक आयुक्यांनी सकाळीच अहवाल अद्याप पूर्ण झाला नसून अहवाल पूर्ण करण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागितली होती. यावर आज वाराणसी कोर्टाने निर्णय दिला. (Gyanvapi Masjid Surve)

न्यायालयाने कोर्ट कमिश्नर अजय कुमार मिश्रा (Ajay Mishra) यांना हटवले आहे. तसेच, विशाल सिंह (Vishal Singh) आणि अजय सिंह प्रताप (Ajay Singh Pratap) हे टीमचा हिस्सा असून त्यांना सर्व्हेचा अहवाल सादर करण्यासाठी 2 दिवसांची मुदत दिलीय. 2 दिवसांनंतर कोर्टात ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश वाराणसी कोर्टाने दिले आहे. तसेच, कोर्टात उद्या (बुधवारी) 2 याचिकांवर सुनावणी होणार आहे.

 

दरम्यान, शिवलिंग सापडलेली जागा सील केल्यानंतर नमाज पठण करणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाईप दुसरीकडे लावण्यात यावा जेणेकरून वाझु होऊ शकेल.
त्याचबरोबर, तलावातील मासे आणि नमाज पठण करणाऱ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था, या 2 मुद्द्यांवर बुधवारी कोर्टात सुनावणी होणार आहे.
या दरम्यान, अजय कुमार मिश्रा यांच्यावर गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप आहे.
आरोप लक्षात घेता न्यायालयाने मिश्रा यांना हटवले आहे. असा आरोप कोर्ट कमिश्नर विशाल सिंह यांनी केला.
तसेच, ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात मुस्लिम पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती.
यावर अजुन सुनावणी सुरू आहे.

 

Web Title :- Gyanvapi Masjid Surve | Gyanvapi Masjid Surve advocate commissioner ajay kumar mishra removed from his post appointed by the court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा