धक्कादायक ! पुण्यात जीम ट्रेनरचा कॉलेजात जाऊन विद्यार्थीनीचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यायामासाठी जीममध्ये येणार्‍या तरुणीची ओळख झाल्यानंतर ट्रेनरने तिच्या कॉलेजात जाऊन विनयभंग केला. त्यानंतर कॉलेजमध्ये मोठ-मोठ्या आरडा-ओरडा करत न बोलल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या ट्रेनरला अटक केली आहे.

कृष्णा प्रकाश कदम (वय 22, रा. सुप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात 19 वर्षीय विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम येथील एका जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. येथे तरुणी जीमसाठी येत असत. कदम याची तरुणीसोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर तो तिच्य संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांपुर्वी त्याने तरुणीला तुझ्या शिवाय जगू शकत नाही, असे म्हणत तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले.

मात्र, तरीही तरुणीने दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याचे धाडस वाढले. तरुणी शिक्षण घेत असणार्‍या कॉलेजमध्ये गेला. तरुणीची परिक्षा सुरू असताना आरोपीने वर्गात जाऊन तिच्या हाताला धरून खाली ओढत आणले. माझ्याशी का बोलत नाही, अशी विचारणा करत न बोलल्यास जीवाचे काही तरी बरेवाईट करेल. तुझे नाव घेईल, अशी धमकी दिली. तसेच, कॉलेज परिसरात तिच्या मनास लज्जा होईल, असे जोराने ओरडला. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.