एच- ४ व्हिसाधारकांचा परवाना रद्द होणार ?

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था 

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत H-४ व्हिसाधारकाना देण्यात आलेला काम करण्याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या प्रस्तावित निर्णयामुळे सर्वात मोठा फटका अमेरिकी-भारतीय महिलांना बसणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कार्यकालात हे परवाने देण्यात आले होते. त्यावेळी अमेरिकी-भारतीय महिलांनी या निर्णयाचा सर्वाधिक फायदा घेतला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’77b559f1-be68-11e8-9877-4137297b1db1′]

यूएस सिटिझनशीप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसद्वारे (USCIS) H-4 व्हिसा जारी करण्यात आले होते. हा व्हिसा H-1B व्हिसा धारकांच्या जवळच्या कुटुंबीयांना (पती, पत्नी किंवा २१ वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठी) दिला जातो. भारतीय आयटी व्यावसायिकांकडून या व्हिसाला अधिक मागणी असते.

अन्यथा … गणपती नाही तर, सरकारचे विसर्जन

H-1B व्हिसा धारकांच्या जवळच्या नातेवाईकांना H-4 द्वारे मिळणाऱ्या कामाचा परवाना रद्द करण्यात येणार असून त्या दिशेने जलदगतीने पावले उचलली जातील अशी माहिती डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटीने (DHS) काल (शुक्रवार) कोलंबियातील यूएस जिल्हा न्यायालयात सादर केली आहे. हे नवे नियम लवकरात लवकर लागू करण्यात येतील असेही DHS ने सांगितले आहे. हे नियम अर्थसंकल्पातील तरतुदी करणाऱ्या कार्यालयाला येत्या तीन महिन्यात सादर करण्यात येणार आहेत. तो पर्यंत प्रस्तावित नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी स्थगित ठेवावी अशी विनंती DHSने न्यायालयाला केली आहे. तर दुसरीकडे, याचिका दाखल करणाऱ्या गटाने यावर जलद गतीने सुनावणी घ्यावी अशी विनंती केली आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’930a9312-be68-11e8-9016-a5ffbe7dff57′]

ट्रम्प सरकारच्या अशा प्रकारच्या निर्णयामुळे आमच्या नोकऱ्यांवर विपरित परिणाम होईल असे ‘सेव्ह जॉब्स यूएस’ या अमेरिकेतील नोकरदारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनेने याचिकेत म्हटले आहे. ट्रम्प प्रशासन सध्या H-1B व्हिसा धोरणाचा आढावा घेत आहे. कंपन्या या व्हिसाचा दुरुपयोग करत अमेरिकी नोकरदारांना डावलून इतर देशातील लोकांना नोकऱ्या देतात असे सरकारचे म्हणणे आहे.

दानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार

H-4 व्हिसाच्या आधारे कामाचा परवाना देण्याचा निर्णय ओबामा प्रशासनाने मे २०१५मध्ये घेतला होता. या आधारे USCISने एकूण १,२६,८५३ अर्ज मंजूर केले आहेत.