H V Desai Eye Hospital | PBMA च्या एच व्ही देसाई नेत्र रुग्णालायत OPD चे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बालदिन (Children’s Day) आणि जागतिक मधुमेह दिनाचे (World Diabetes Day) औचित्य साधून पीबीएमएच्या एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयात (H V Desai Eye Hospital) ओपीडीचे (OPD) उद्घाटन करण्यात आले. शीतल नवानी (Sheetal Navani) यांच्या हस्ते आज (रविवार) नवीन ओपीडीचे उद्घाटन करण्यात आले. पीबीएमएचे एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय (H V Desai Eye Hospital) हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय आहे.

 

यावेळी पीबीएमएचे चेअरमन नितीन देसाई (PBM Chairman Nitin Desai), अध्यक्ष राजेश शहा (Rajesh Shah), विश्वस्त रोहित जिराजानी,
मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. मदन देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जी.व्ही राव. वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे,
डॉ. सुचेत कुलकर्णी, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

 

एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयात आतापर्यंत 60 लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
तर 6 लाखांहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली आहे.
यापैकी 4 लाखांहून अधिक रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.
रुग्णालयातील सेवा वाढविण्यासाठी आणि नोकरदार लोकांच्या विशेष मागणीनुसार आज रुग्णालयात ओपीडी सुरु करण्यात आली आहे.
ओपीडी दर रविवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत सुरु राहणार आहे.

 

Web Title : H V Desai Eye Hospital | Inauguration of OPD at PVMA’s HV Desai Eye Hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vikram Gokhale | राजकारण्यांनी ST ची वाट लावली, ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंचा संताप

Izzat MST | रेल्वेने कमी केली माननीयांची ’इज्जत’, नियमांमध्ये केले ‘हे’ बदल, गरिब प्रवाशांच्या अडचणी वाढणार

Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तेव्हा फडणवीस मला चूक झाली म्हणाले होते’