H3N2 Infection – Pimpri Chinchwad News | पिंपरी-चिंचवडमध्ये एच 3 एन 2 ने बाधित झाल्याने एकाचा मृत्यू; डॉक्टरांकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – H3N2 Infection – Pimpri Chinchwad News | पिंपरी-चिंचवड परिसरात एच 3 एन 2 ने बाधित झाल्याने एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मयत झालेल्याचे वय 73 असून त्यांच्यावर 8 मार्चपासून आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आज (दि. 16) सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे डॉक्टर विनय पाटील (Dr. Vinay Patil PCMC) यांनी शहर आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. (H3N2 Infection – Pimpri Chinchwad News)

एच 3 एच 2 व्हायरस (H3N2 Virus)बाबत काळजी घेण्याची आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन एच 3 एन 2 चा आढवा घेणार आहेत. बैठकीमध्ये मास्कबद्दल देखील चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी सर्वांनीच मास्क परिधान करायला हवा. ताप, सर्दी, खोकला असेल तर लागलीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन एच 3 एन 2 ची तपासणी करून घ्यावी. ज्येष्ठ आणि वृध्दांनी काळजी घ्यावी असे आवाहन राज्य आरोग्य विभागाकडून देखील करण्यात आले आहे. (Influenza Virus)

यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात (YCM Hospital Pimpri) दि. 8 मार्च पासून आयसीयुमध्ये उपचार घेणार्‍या 73 वर्षीय वृध्दाचा आज मृत्यू झाला आहे. मृत वृध्दाला सहव्याधी असल्याचं देखील डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (H3N2 Infection – Pimpri Chinchwad News)

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्र्याचे आवाहन

मुंबई : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे (Symptoms Of Influenza Virus) दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr Tanaji Sawant) यांनी केले.

एच३एन२ फ्ल्यू (H3N2 Flu) सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री सावंत यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन केले.

मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये
एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे.
इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१ एन १ एच३एन२ इ. या आजाराचे सर्वसाधारण लक्षणे
ताप, खोकला घशात खवखव धाप लागणे, न्यूमोनिया आढळून येतात. इन्फ्लूएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात. १३ मार्च २०२३ अखेर एच१ एन१ (H1N1) बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर
जिल्हयातील शहरी भागात दिसून येत आहे. या आजाराचे लक्षणे तसेच उपचार पध्दती या बाबत मार्गदर्शक
सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांना आवश्यकतेनुसार
विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येतात. तसेच आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी
औषधे उपलब्ध असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

Web Title :-  H3N2 Infection – Pimpri Chinchwad News | man died of h3n2 infection in pimpri chinchwad pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | 23 गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन सोपवावे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… !महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

Nana Patole Taunt To Ajit Pawar | नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘माझं नाव नाना आहे, दादा नाही त्यामुळे…’

Sanjay Mayekar Pune | संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? जाणून घ्या ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसला जागा किती