H3N2 Virus | राज्यात H3N2 चा धोका वाढला, पुन्हा निर्बंध लागणार? मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची लाट (Corona Wave) ओसल्यानंतर राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले. कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजिवन पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच H3N2 संसर्गजन्य व्हायरसने (H3N2 Virus) डोकं वर काढलं आहे. मागील तीन दिवसांत H3N2 व्हायरसमुळे (H3N2 Virus) राज्यात तीन जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नुकतीच संसर्गजन्य H3N2 बाबात आढावा बैठक घेऊन नवे आदेश दिले आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या संसर्गजन्य H3N2 च्या आढावी बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड/ H3N2 हे दोन्ही संसर्गजन्य (H3N2 Virus) असून दोन्हींची लक्षणे सारखी आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा अॅक्टीव्ह करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

याशिवाय गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे.
तसेच सर्दी, खोकला यासारखी लक्षणं आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी,
अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरण्याचे आवाहन करण्याबाबत सूचना देखील त्यांनी बैठकीत दिल्या आहेत.

 

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 या व्हायरसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील हा तिसरी बळी असून यापूर्वी अहमदनगर आणि नागपूर याठिका H3N2 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- H3N2 Virus | 3 people died due to h3n2 virus chief minister shinde advised to use mask

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 25 हजाराच्या लाच प्रकरणी नायब तहसिलदारासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Pune Crime News | दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वीच खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर