तुमच्या जुन्या फोन नंबरने तुमची वैयक्तिक माहिती केली जात आहे लीक, ‘या’ ठिकाणी केला जात आहे वापर

नवी दिल्ली : तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा तुम्ही तुमचा जुना फोन नंबर बदलता आणि नवीन नंबर घेता तेव्हा त्या जुन्या नंबरचे काय होते? मोबाइल कॅरियर्स नेहमी त्या जुन्या नंबरला रिसायकल करतात आणि त्याच्या बदल्यातच तुम्हाला नवीन नंबर देतात. परंतु अनेक यूजर्ससाठी ही प्रोसेस सुरक्षित नसते. जेव्हा तुमचा जुना नंबर एखाद्या नव्या यूजरला दिला जातो तेव्हा तुमच्या जुन्या नंबरचा डेटा त्या यूजरसाठी अ‍ॅक्सेसेबल होतो.

यामुळे यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात येते. प्रिंसटन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आपल्या नवीन रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, तुमच्या जुन्या नंबरने तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा तुम्ही नंबर बदलता तेव्हा तुमच्या डिजिटल अकाऊंट्समध्ये तो नंबर अपडेट करणे विसरून जाता. म्हणजे ई कॉमर्स अ‍ॅप्सवर जुन्या नंबरनेच त्याचा वापर करत असता तसेच अनेक अ‍ॅप्समध्ये सुद्धा. अशावेळी यांना तुम्ही नवीन नंबरने अपडेट करणे विसरून जाता.

युनिव्हर्सिटीने सांगितले की, एका पत्रकाराला नवीन नंबर मिळताच त्याच्या फोनवर ब्लड टेस्ट रिझल्ट आणि स्पा अपॉईन्टमेंटचे अनेक मेसेज येऊ लागले. अरविंद नावाच्या एका रिसर्चरने सांगितले की, आम्ही 200 रिसायकल नंबर्स एक आठवड्यासाठी वापरले आणि आढळले की, त्यामध्ये 19 नंबरवर अजूनही सिक्युरिटी, प्रायव्हसीशी संबंधीत कॉल आणि मेसेज येत होते. म्हणजे नव्या यूजर्सला ही सर्व माहिती मिळत होती.

रिसर्चने येथे रिसायकलिंगबात 8 धोके सांगितले. यामध्ये सर्वात मोठा धोका हा आहे की, तुमचा डेटा चोरी होऊ शकतो. म्हणजे नवीन सबस्क्रायबरला तुमचा जुना नंबर देताच एसएमएसद्वारे त्याची माहिती घेतली जाऊ शकते. सबस्क्रायबर्स अशावेळी मेसेज पाहून जाळ्यात अडकला जाईल आणि विश्वास ठेवू शकतो. तसेच अटॅकर तुमच्या जुन्या नंबरवरून कुठेही लॉगईन किंवा न्यूजलेटर्समध्ये वापर करू शकतो तसेच अनेक एसएमएस सर्व्हिस चालू करू शकतो.