महिलांनो सावधान ! व्हायरसच्या मदतीने हॅकर्स तुमचे फोटोही करु शकतात ‘हॅक’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – तरुणी आणि महिलांनी स्मार्ट फोन वापरताना गॅलरीला सुरक्षित पासवर्ड देणे, योग्य अँटी व्हायरस ठेवणे गरजेचे बनले आहे कारण सायबर हॅकर्स आता खास व्हायरसच्या मदतीने महिला आणि तरुणींच्या स्मार्ट फोनची गॅलरी सहज हॅक करु शकतात. त्यामुळे स्मार्ट फोन वापरताना तरुणी आणि महिलांनी सावधानता बाळगली पाहिजे अशी सूचना नागपूर पोलिसांनी दिली आहे.

‘जागरूक मी व समाज’ मोहीम
नागपुरात फ्रेंड्स गार्मेंट्स या कपड्यांच्या शोरुममधील ट्रायल रुम मध्ये छुप्या कॅमेऱ्याने तरुणींच्या चित्रीकरणाची घटना घडल्यानंतर नागपूर पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी ‘जागरूक मी व समाज’ अशी मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी शाळा आणि महाविद्यालयात जाऊन तिथल्या विद्यार्थिनीसोबत संवाद साधताना नव्या गेजेट्स आणि टेक्नोलॉजीचा वापर करताना काय सावधगिरी बाळगावी याचे प्रशिक्षण देणे सुरु केले आहे.

‘जागरूक मी व समाज’ या मोहिमेअंतर्गत सायबर सेलच्या प्रमुख डीसीपी श्वेता खेडेकर यांनी नागपूरच्या महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थिनी आणि महिलांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की , ‘सायबर हॅकर्स आता खास व्हायरसच्या मदतीने महिला आणि तरुणींच्या स्मार्ट फोनची गॅलरी सहज हॅक करु शकतात. एखाद्या मालवेयर/वायरसने एखाद्याच्या स्मार्ट फोनची गॅलरी ताब्यात घेऊन त्यातील फोटोंचा गैरवापर करणे किंवा कॅमेरा हॅकिंग तंत्राद्वारे तुम्हाला न कळत तुमच्या स्मार्ट फोनद्वारे तुमच्या खाजगी आयुष्याचे फोटो क्लिक करणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोन वापरताना तरुणी आणि महिलांनी सावधानता बाळगली पाहिजे.’

आरोग्यविषयक वृत्त –